AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलची वर्षभरात नाही झळ, दर कपातीचे कधी देणार फळ, एक लिटरसाठी खिशाला झळ

Petrol Diesel Rate Today : देशात गेल्यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस केंद्र आणि त्यानंतर राज्य सरकारने केलेली उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित करातील कपात दिलासा देणारी ठरली. पण स्वस्त पेट्रोल-डिझेलचे स्वप्न अजून काही प्रत्यक्षात उतरले नाही.

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलची वर्षभरात नाही झळ, दर कपातीचे कधी देणार फळ, एक लिटरसाठी खिशाला झळ
दर कपात केव्हा
| Updated on: May 26, 2023 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली : स्वस्त पेट्रोल-डिझेलचे स्वप्न केंद्र सरकारने अजूनही पूर्ण केले नाही. देशात गेल्यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस केंद्र आणि त्यानंतर राज्य सरकारने केलेली उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित करातील कपात दिलासा देणारी ठरली. पण स्वस्त पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) स्वप्न अजून काही प्रत्यक्षात उतरले नाही. जागतिक बाजारात कच्चा तेलाने (Crude Oil) आज दुडूदुडू चालीला ब्रेक लावला. काल अचानक भावाने उसळी घेतली होती. आज 2-3 डॉलर प्रति बॅरलने भाव घसरले आहेत. राज्यात पुणे शहरात पेट्रोल-डिझेल सर्वात स्वस्त आहे. मग तुमच्या शहरात एक लिटरसाठी खिशाला किती रुपयांची झळ बसेल.

क्रूड ऑईलचा आजचा भाव आज 26 मे रोजी, कच्चा तेलाने दरवाढीला ब्रेक दिला. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) आता 71.90 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 76.17 डॉलर प्रति बॅरल झाला.

मोठा बदल नाही केंद्र सरकारने 22 मे रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात केली. त्यानंतर देशातील भाजपशासित राज्यांनी तोच कित्ता गिरवला. त्यांनी मूल्यवर्धीत करात कपात केली. त्यामुळे जनतेला एका लिटरमागे 10 ते 12 रुपयांचा फायदा झाला. पण गेल्या एक वर्षात इंधनाच्या भावात कोणताही मोठा बदल झालेला नाही. . प्रति लिटर इतका फायदा देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती  गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.

करासंबंधी असा झाला बदल

  1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती
  2. देशात गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल दिसून आला
  3. पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 6 रुपयांची कपात झाली
  4. त्यानंतर काही राज्यांनी ही त्यांच्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax-VAT) कपात केली होती
  5. महाराष्ट्रात पेट्रोलमध्ये 5 तर डिझेलवर 3 रुपयांचा व्हॅट घटवला
  6. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या सरकारने 14 जुलै 2022 रोजी हा निर्णय घेतला होता
  7. हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला डिझेलवर 3 रुपये व्हॅट लावला
  8. पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 90 पैसे सेस लावला
  9. केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पेट्रोल-डिझेलवर 2 रुपये प्रति लिटर सामाजिक सुरक्षा उपकर (Cess) लावला
  10. पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तेल कंपन्यांची ओरड होती.
  11. केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना मोठी आर्थिक मदत केली

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....