petrol diesel price today : तुमच्या शहरात आज पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा ताजे दर

याआधी, गेल्या 10 दिवसांत तेल कंपन्यांनी किंमती 3 वेळा कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.

मुंबई : तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी, गेल्या 10 दिवसांत तेल कंपन्यांनी किंमती 3 वेळा कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. मागील 30 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यात आल्या. त्या काळात पेट्रोल प्रति लिटरच्या किंमती 22 पैशांनी आणि डिझेलच्या किंमती 23 पैशांनी कमी झाल्या. (petrol diesel price today 5th april 2021 mumbai new delhi kolkata chennai rates)

आज किंमती स्थिर राहिल्यानंतरही राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 90.56 रुपये आहे. तर आज इथे डिझेलची किंमत प्रति लिटर 80.87 रुपये आहे. त्याचप्रमाणे आर्थिक राजधानी मुंबईत आज पेट्रोलची किंमत 96.98 रुपये तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 87.96 रुपये आहे. इंडियन ऑईलच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती घेण्यात आली आहे.

वेगवेगळ्या राज्यात आकारण्यात येणाऱ्या करांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तफावत आहे. याशिवाय इंधनाच्या वाहतुकीच्या शुल्कामध्येही फरक आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांचे अपडेट

अहमदनगर – 96.87

अकोलो – 96.85

अमरावती – 97.70

औरंगाबाद – 98

कोल्हापूर – 97.11

नागपूर – 97.01

नाशिक – 97.13

पुणे – 96.89

शहर                        पेट्रोल (रुपये/लीटर)        डिझेल (रुपये/लीटर)

नवी दिल्‍ली                  90.56                                     80.87

मुंबई                           96.98                                     87.96

कोलकाता                  90.77                                      83.75

चेन्‍नई                          92.58                                    85.88

नोएडा                         88.91                                      81.33

पेट्रोल-डिझेलवर किती आकारला जातो कर ?

एकूणच केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोलवर 60 टक्के आणि डिझेलवर 54 टक्के कर लावतात. उत्पादन शुल्क म्हणून केंद्र सरकार प्रतिलिटर पेट्रोलसाठी 32.90 रुपये घेते. तर डिझेलसाठी ते प्रति लिटर 31.80 रुपये आहे.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सोडल्या जातात. कच्च्या तेलाची किंमत आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती लक्षात घेऊन तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात किरकोळ इंधनाची किंमत निश्चित करतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol diesel price today 5th april 2021 mumbai new delhi kolkata chennai rates)

संबंधित बातम्या – 

स्वस्तात खरेदी करा Mi, सॅमसंग आणि LG धमाकेदार स्मार्ट TV, वाचा काय आहे किंमत?

बोनससह लाखो रुपये कमावण्याची सुवर्णसंधी, रोज करा फक्त 189 रुपयांची बचत

विमानतळावर कोव्हीड-19 प्रोटोकॉलचे उल्लंघन करू नका, नाहीतर होईल मोठं नुकसान

(petrol diesel price today 5th april 2021 mumbai new delhi kolkata chennai rates)

Published On - 7:14 am, Mon, 5 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI