AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग?, वाचा राज्यभरातील ताजे दर

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल हे 95 रुपयांच्या पुढे विकले जात असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे.

Petrol Diesel Price Today : आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग?, वाचा राज्यभरातील ताजे दर
| Edited By: | Updated on: Mar 28, 2021 | 8:04 AM
Share

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज सातत्याने चढ-उतार होत असतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल हे 95 रुपयांच्या पुढे विकले जात असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण येत्या काही दिवसात इंधनाचे दर कमी होणार असल्याचे बोलल जात आहे. (Petrol Diesel Price Today on 28 march 2021 latest price Update Maharashtra fuel rates)

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. अवघ्या दोन दिवसांपूर्वी पेट्रोलचे दर कमी झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा इंधनाचे दर घसरले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण आज दरांमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचं दिसून आलं आहे

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर हा 99.39 इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 99.29 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर 88.98 रुपये इतका आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पेट्रोल-डिझेलचे दर 

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 97.70 ₹ 87.36
2 अकोला ₹ 97.38 ₹ 87.07
3 अमरावती ₹ 98.31 ₹ 87.97
4 औरंगाबाद ₹ 98.20 ₹ 87.83
5 भंडारा ₹ 97.89 ₹ 87.56
6 बीड ₹ 98.50 ₹ 88.14
7 बुलडाणा ₹ 98.39 ₹ 88.01
8 चंद्रपूर ₹ 97.67 ₹ 87.36
9 धुळे ₹ 97.67 ₹ 87.33
10 गडचिरोली ₹ 98.22 ₹ 87.88
11 गोंदिया ₹ 98.03 ₹ 87.70
12 मुंबई उपनगर ₹ 97.23 ₹ 88.24
13 हिंगोली ₹ 97.89 ₹ 87.56
14 जळगाव ₹ 97.45 ₹ 87.11
15 जालना ₹ 98.48 ₹ 88.10
16 कोल्हापूर ₹ 97.21 ₹ 86.90
17 लातूर ₹ 98.53 ₹ 88.17
18 मुंबई शहर ₹ 97.19 ₹ 88.20
19 नागपूर ₹ 97.03 ₹ 86.73
20 नांदेड ₹ 99.29 ₹ 88.90
21 नंदूरबार ₹ 97.94 ₹ 87.59
22 नाशिक ₹ 97.53 ₹ 87.15
23 उस्मानाबाद ₹ 97.81 ₹ 87.47
24 पालघर ₹ 96.97 ₹ 86.62
25 परभणी ₹ 99.39 ₹ 88.98
26 पुणे ₹ 96.84 ₹ 86.52
27 रायगड ₹ 96.77 ₹ 86.43
28 रत्नागिरी ₹ 98.71 ₹ 88.32
29 सांगली ₹ 97.56 ₹ 87.24
30 सातारा ₹ 97.88 ₹ 87.52
31 सिंधुदुर्ग ₹ 98.56 ₹ 88.21
32 सोलापूर ₹ 96.99 ₹ 86.68
33 ठाणे ₹ 97.25 ₹ 88.26
34 वर्धा ₹ 97.50 ₹ 87.18
35 वाशिम ₹ 97.67 ₹ 87.35
36 यवतमाळ ₹ 98.49 ₹ 88.14

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today on 28 march 2021 latest price Update Maharashtra fuel rates)

संबंधित बातम्या : 

एसबीआय, एचडीएफसी, पीएनबीसह या बँकांच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, 1 एप्रिलपासून बंद होऊ शकते ही सेवा

1 एप्रिलपासून बँकेच्या PF, TDS आणि ITR च्या 6 नियमात बदल, तुमच्यावरही ‘हा’ परिणाम होणार

(Petrol Diesel Price Today on 28 march 2021 latest price Update Maharashtra fuel rates)

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.