AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्थिक अडचण असेल तर काळजी सोडा, सोप्या पद्धतीनं काढा PF अकाऊंटमधून अ‍ॅडव्हान्स पैसे

लॉकडाऊन आणि आर्थिक अडचणींमुळे सरकारने काही कालावधीसाठी ही सूट दिली आहे. केंद्र सरकारने नियम शिथिल केल्यानंतर EPFO द्वारे कर्मचार्‍यांनीही याचा लाभ घेता येणार आहे.

आर्थिक अडचण असेल तर काळजी सोडा, सोप्या पद्धतीनं काढा PF अकाऊंटमधून अ‍ॅडव्हान्स पैसे
या सुविधेअंतर्गत ईपीएसने सदस्यांना कर्मचारी निवृत्तीवेतन योजना 1995 अंतर्गत योजनेच्या प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सहजसोपे केले आहे. अशा सदस्यांना योजनेचे प्रमाणपत्र दिले जाते, जे EPFमधील योगदान काढून घेतात.
| Edited By: | Updated on: Oct 05, 2020 | 10:56 AM
Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे प्रत्येकावर आर्थिक संकट ओढावलं आहे. अशात केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या PF संदर्भात महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (EPF – Employee Provident Fund) आता आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन आणि आर्थिक अडचणींमुळे सरकारने काही कालावधीसाठी ही सूट दिली आहे. केंद्र सरकारने नियम शिथिल केल्यानंतर EPFO द्वारे कर्मचार्‍यांनीही याचा लाभ घेता येणार आहे. (pf account how to claim and withdraw advance amount know in detail)

44 हजार कोटींपेक्षा जास्त PF काढला गेला EPFO ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून, 38,71,664 लोकांनी कर्माचारी भविष्य निर्वाह निधीतून आतापर्यंत 44,054.72 रुपये काढले आहेत. यामध्ये कोविड -19 संबंधित क्लेम सुद्धा देण्यात आले असल्याची माहिती कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त महाराष्ट्रातूनच 25 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत 7,23,986 कर्मचार्‍यांनी सुमारे 8,968.45 कोटी रुपये काढले आहेत.

खरंतर, 1 सप्टेंबरनंतर PF खात्यातून (PF Account) आगाऊ रक्कम काढण्यासाठी सरकारची सूट बंद झाली आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत तुम्ही पैसे काढू शकत नाही. पण असं असलं तरी कर्मचार्‍यांना अजूनही त्यांच्या PF खात्यातून पैसे काढण्याचा पर्याय आहे. यासाठी सरकारी योजना नाही तर पीएफ खात्यातून पैसे काढावे लागणार आहेत. यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे पाहुयात. (pf account how to claim and withdraw advance amount know in detail)

1. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यासाठी आधी तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावं लागेल. यानंतर UAN आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. यावेळी तुमचं PF खातं आधारशी जोडलेलं असलं पाहिजे.

2. या पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर Online Service वर क्लिक करा आणि Claim (Form-31, 19 & 10C) ला निवडा.

3. यानंतर तुम्हाला बँक अकाऊंट नंबर टाकून Verify वर क्लिक करा. पुढे Yes वर क्लिक करून Proceed For Online Claim असा पर्याय निवडा.

4. ऑनलाईन फंड काढण्यासाठी PF Advance (Form 31) निवडा. आता इथे तुम्हाला ही रक्कम का काढायची आहे, याचं कारण लिहावं लागेल आणि तुमचा पत्ता लिहावा लागेल.

5. पैसे काढण्यासाठी तुम्ही जे कारण सांगितलं आहे, त्यासंबंधीची कागदपत्रं तुम्हाला स्कॅन करून जोडावी लागतील. EPF अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला कंपनीचीही परवानगी घ्यावी लागेल.

6. कंपनीची परवानगी मिळाल्यानंतर तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होतील. यावेळी तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरवर एक मेसेज मिळेल. बँकेत पैसे ट्रान्सफर होण्यासाठी काही ठराविक कालावधी लागतो.

संबंधीत बातम्या – 

रोज 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर व्हा 14 लाखांचे मालक, जाणून घ्या काय आहे योजना?

SBI ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल, ट्रॅन्झॅक्शन फेल झाल्यास ग्राहकांकडून शुल्क

(pf account how to claim and withdraw advance amount know in detail)

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.