AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राची जबरदस्त योजना, ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळणार 90 लाख नवीन रोजगार

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत मायक्रो फूड प्रोसेसिंग उद्योगांसाठी 10000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

केंद्राची जबरदस्त योजना, 'या' 5 मुद्द्यांमुळे मिळणार 90 लाख नवीन रोजगार
| Edited By: | Updated on: Dec 28, 2020 | 10:38 PM
Share

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत केंद्र सरकारने (Central Government) अनेक आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, पीएम कृषी संपदा योजनेअंतर्गत मेगा फूड पार्क्स, कोल्ड चेन, एग्रो प्रोसेसिंग क्लस्टर सारख्या तब्बल 6500 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत मायक्रो फूड प्रोसेसिंग उद्योगांसाठी 10000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या घोषणेचा फायदा कृषी आणि त्यासंदर्भातील महत्त्वाच्या कामांसाठी खूप महत्त्वाची आहे. (pm kisan sampada yojana will double the farmers income by food processing and infrastructure development)

प्रधानमंत्री किसान संपदा योजना (pm kisan sampada yojana) हे एक केंद्र सरकारचं मोठं पॅकेज आहे. ज्यामध्ये शेतीपासून किरकोळ दुकानात पुरवठा करण्याच्या व्यवस्थापनासह आधुनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे फक्त देशातल्याच फूड प्रोसेसिंग क्षेत्रात नाही तर सर्वच स्तरावर याला गती मिळणार आहे. या योजनेमुळे खासकरून शेतकऱ्यांना चांगल्या किंमती मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास, शेतीच्या उत्पादनांचा अपव्यय कमी करण्यास आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाची निर्यात वाढवण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

1) काय आहे प्रधानमंत्री किसान संपदा योजना ज्यामध्ये 6500 प्रकल्पांना मिळाली मंजुरी?

देशात प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची सुरुवात ऑगस्त 2017 मध्ये झाली. या योजनेमध्ये कृषीसंबंधी कामं केली जातात. कृषी क्षेत्रात आणखी प्रगती करण्यासाठी आणि अत्याधुनिक सेवांसह प्रगती करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.

2) प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचं मुख्य उद्दिष्ट्यं काय?

शेतकऱ्यांना जास्त नफा मिळवून देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. शेतीविषय साहित्य, भाजीपाला वेळेवर बाजारात पोहोचवण्यापासून ते मोठ्या प्रमाणावर काम करून रोजगाराच्या नवीन संधी कशा निर्माण करता येतील हे या योजनेचं उद्दिष्ट्यं आहे.

3) फूड प्रोसेसिंग म्हणजे काय आणि यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे?

पंतप्रधान किसान संपदा योजनेत संपूर्ण लक्ष हे अन्न प्रक्रियेवर आहे. फूड प्रोसेसिंग अंतर्गत, प्राथमिक खाद्यपदार्थ अनेक वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये रूपांतरित होते. उदाहरणार्थ, गहू, डाळ किंवा इतर बर्‍याच गोष्टी बनवणं या प्रकारात मोडतं.

4) रोजगार वाढवणं आणि शेतकर्‍यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना कशी आहे प्रभावी ?

भारतातील अन्न प्रक्रिया क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगाराच्या नवीन संधी आहेत. केंद्राच्या अहवालानुसार, 2024 पर्यंत भारताच्या अन्न प्रक्रिया क्षेत्रात अब्ज डॉलर्स नवीन गुंतवणूक होणार असून 90 लाख नवीन रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे.

5) भारतात अन्न प्रक्रिया करणार्‍या वस्तूंची मागणी का वाढत आहे आणि भविष्यात त्याच्या शक्यता काय आहेत?

खरंतर, भारतात प्रोसेस्ड फूडची मागणी वेगाने वाढत आहे. भविष्यात तर यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात मोठ्या संख्येने तरुण लोकसंख्या आहे. यामुळे जंक फूडची मागणी वाढत आहे. त्यामुळे त्यावर केंद्र सरकार काम करत आहे. (pm kisan sampada yojana will double the farmers income by food processing and infrastructure development)

संबंधित बातम्या –

दिवसाला फक्त 30 रुपयांच्या गुंतवणुकीवर व्हा कोट्याधीश, ‘हे’ आहेत गुंतवणुकीचे उत्तम पर्याय

Fact Check : पुढच्या वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कापणार? पाहा खरं आहे की खोटं

दिवसाला फक्त 20 रुपयांच्या बचतीवर मिळवा 2 लाख 65 हजार, खास आहे LIC ची योजना

(pm kisan sampada yojana will double the farmers income by food processing and infrastructure development)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.