Honouring The Honest | नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन करप्रणाली प्लॅटफॉर्मचे लोकार्पण, काय आहेत वैशिष्ट्ये?

नवीन करप्रणाली प्लॅटफॉर्मवर फेसलेस असेसमेंट (Faceless Assessment), फेसलेस अपील (Faceless Appeal) आणि करदात्यांची सनद (Taxpayers Charter) यासारख्या प्रमुख सुधारणा आहेत.

Honouring The Honest | नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन करप्रणाली प्लॅटफॉर्मचे लोकार्पण, काय आहेत वैशिष्ट्ये?
Follow us
| Updated on: Aug 13, 2020 | 12:01 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पारदर्शी करप्रणाली – प्रामाणिकांचा सन्मान’ (Transparent Taxation – Honouring The Honest) प्लॅटफॉर्मचे लोकार्पण करण्यात आले. 21 व्या शतकातील करप्रणालीची ही नवीन व्यवस्था असल्याचे मोदींनी सांगितले. कर भरण्यास सक्षम व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. (PM Narendra Modi launches the platform for Transparent Taxation Honoring The Honest)

“पाच लाख रुपयांच्या उत्पन्नावर आता कर शून्य झाला आहे. उर्वरित स्लॅबमध्येही कर कमी झाला आहे. कॉर्पोरेट कराच्या बाबतीत आपण जगातील सर्वात कमी कर आकारणार्‍या देशांपैकी एक आहोत, असा दावा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

नवीन करप्रणाली प्लॅटफॉर्मवर फेसलेस असेसमेंट (Faceless Assessment), फेसलेस अपील (Faceless Appeal) आणि करदात्यांची सनद (Taxpayers Charter) यासारख्या प्रमुख सुधारणा आहेत. फेसलेस असेसमेंट आणि करदात्यांची सनद या दोन्ही सुधारणा आजपासून अमलात आल्याचे मोदींनी सांगितले. फेसलेस अपील ही दीन दयाल उपाध्याय यांच्या जन्मदिनापासून म्हणजे 25 सप्टेंबरपासून नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

करयंत्रणा जरी फेसलेस होत असली, तरी करदात्यांना निपक्षपाती (Fairness) आणि निर्भयतेचा (Fearlessness) विश्वास दर्शवते, असे मोदी म्हणाले. “राष्ट्रनिर्माणात देशाचा प्रामाणिक करदाता मोठी भूमिका बजावतो. जेव्हा देशाच्या प्रामाणिक करदात्यांचे जीवन सोपे होते, तेव्हा ते आगेकूच करतात, नंतर देशाचाही विकास होतो, देशदेखील पुढे सरसावतो” असे मोदी म्हणाले.

“आजपासून आलेल्या नवीन व्यवस्था, नवीन सुविधा या “किमान शासन आणि कमाल सुशासन” याबद्दलची आपली वचनबद्धता दृढ करतात. देशवासियांच्या जीवनातून सरकारचा हस्तक्षेप कमी करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे” असेही नरेंद्र मोदी म्हणाले. (PM Narendra Modi launches the platform for Transparent Taxation Honoring The Honest)

“प्रत्येक नियम-कायदा, प्रत्येक धोरणाला आज प्रक्रिया आणि शक्तीकेंद्रित दृष्टिकोनातून बाहेर काढले जात आहे आणि त्यास व्यक्तीकेंद्रित आणि पब्लिक फ्रेंडली बनवण्यावर भर दिला जात आहे. हा नवीन भारताच्या नवीन सुशासनाच्या मॉडेलचा प्रयोग आहे आणि देशाला याचे चांगले परिणाम मिळत आहेत.” असा दावाही पंतप्रधानांनी केला

आता उच्च न्यायालयात 1 कोटी रुपये आणि सर्वोच्च न्यायालयात 2 कोटीपर्यंतच्या खटल्यांची मर्यादा निश्चित केली गेली आहे. ‘विवाद ते विश्वास’ योजनेसारख्या प्रयत्नांमधून बहुतेक खटल्यांचा निकाल कोर्टबाहेर निकाली काढण्याचे प्रयत्न असल्याचे मोदी म्हणाले.

या सर्व प्रयत्नांमध्ये मागील 6-7 वर्षांत आयकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या सुमारे अडीच कोटींनी वाढली आहे. पण हेही खरं आहे की 130 कोटींच्या देशात ती अजूनही खूपच कमी आहे. अशा मोठ्या देशात केवळ दीड कोटी आयकर भरतात. जे कर भरण्यास सक्षम आहेत, परंतु ते अद्याप टॅक्स नेटमध्ये नाहीत, त्यांनी स्वयंप्रेरणा घेऊन पुढे यावे, अशी विनंती मोदींनी केली.

(PM Narendra Modi launches the platform for Transparent Taxation Honoring The Honest)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.