AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMKVY Scheme: आतापर्यंत 1.37 कोटी तरुणांची नोंदणी, 37 विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण उपलब्ध

कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, या योजनेंतर्गत या कालावधीत सुमारे 1.29 कोटी उमेदवार प्रशिक्षित आहेत.

PMKVY Scheme: आतापर्यंत 1.37 कोटी तरुणांची नोंदणी, 37 विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण उपलब्ध
Dharmendra Pradhan
| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 9:56 AM
Share

नवी दिल्लीः PMKVY Scheme details: प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) सुरू झाल्यापासून यंदा 10 जुलैपर्यंत 1.37 कोटी उमेदवारांनी या योजनेंतर्गत नोंदणी केलीय, अशी माहिती सरकारने दिलीय. ही योजना 700 हून अधिक जिल्हे आणि 37 भागांत राबविली गेलीय. कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, या योजनेंतर्गत या कालावधीत सुमारे 1.29 कोटी उमेदवार प्रशिक्षित आहेत.

700 हून अधिक जिल्ह्यांत 137 लाख उमेदवारांची नावनोंदणी

“पीएमकेव्हीवाय अंतर्गत, 10 जुलै 2021 पर्यंत, ही योजना सुरू झाल्यापासून 700 हून अधिक जिल्ह्यांत 137 लाख उमेदवारांची नावनोंदणी करण्यात आली,” असे त्यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. कौशल्य विकासाद्वारे भारतीय तरुणांना सशक्त बनवण्याचा हेतू आहे. स्किल इंडिया मिशन अंतर्गत मंत्रालय आपली प्रमुख योजना पीएमकेव्हीवाय राबवित आहे, ज्यामध्ये शॉर्ट टर्म ट्रेनिंग (STT) आणि प्रीमियर लर्निंग (RPL) चे दोन घटक आहेत.

8805 कोटी खर्च झाले

10 जुलैपर्यंत 10,641 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय वाटपाच्या तुलनेत 8,805.82 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. दुसर्‍या उत्तरामध्ये ते म्हणाले की, पीएमकेव्हीवायच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत देशभरात आठ लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य आहे.

ही योजना जुलै 2015 मध्ये सुरू करण्यात आली

भारत सरकारची प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) जुलै 2015 मध्ये सुरू करण्यात आली. जे लोक कमी शिक्षित आहेत किंवा ज्यांनी शाळा सोडल्या आहेत, अशा लोकांना रोजगार पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. देशातील सर्व तरुणांना संघटित करणे आणि त्यांची कौशल्ये सुधारणे आणि त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जास्तीत जास्त लोकांना या योजनेत सामील होण्यासाठी तरुणांना कर्ज घेण्याची सुविधा देखील आहे.

प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क नाही

या योजनेत तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षासाठी नोंदणी केली जाते. कोर्स संपल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र संपूर्ण देशात वैध आहे. तरुणांना कोणतेही प्रशिक्षण शुल्क भरावे लागत नाही, फी सरकारच भरते. या योजनेंतर्गत बहुतेक कमी शिक्षित किंवा माध्यमिक शाळा सोडलेल्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. कोणतीही स्वारस्य असलेली व्यक्ती पीएमकेव्हीवायसाठी http://pmkvyofficial.org येथे भेट देऊन अर्ज करू शकते.

संबंधित बातम्या

International Flight Suspension: कोरोना संकटात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी, सेवा 31 ऑगस्टपर्यंत स्थगित

सरकार पेन्शन नियमात बदल करण्याच्या तयारीत, जाणून घ्या, फायदा कसा मिळणार?

PMKVY Scheme: So far 1.37 crore youth have been registered, training is available in 37 different fields

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.