AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office : पोस्टाच्या या योजनेत जोरदार परतावा, कर सवलतीसह इतर पण अनेक फायदे

Post Office : या योजनेत जोरदार परताव्यासह इतरही अनेक फायदे मिळतात.

Post Office : पोस्टाच्या या योजनेत जोरदार परतावा, कर सवलतीसह इतर पण अनेक फायदे
| Updated on: Jan 07, 2023 | 11:27 PM
Share

नवी दिल्ली : राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate Scheme), ही पोस्टाची एक जोरदार योजना आहे. टपाल खात्याच्या बचत योजना (Saving Scheme) या जोखीममुक्त असतात. यामध्ये तुमच्या गुंतवणुकीला संरक्षण मिळते. त्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळतो. तसेच या कमाईवर कर सवलतही मिळते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर व्याजही वाढले आहे. या योजनेवर पूर्वी 6.8 टक्के व्याज (Interest Rate) मिळत होते. 1 जानेवारी 2023 रोजीपासून या योजनेवर 7 टक्के व्याज मिळत आहे.

NPS योजनेतील गुंतवणूक फायदेशीर ठरते. या योजनेवर कर सवलतही मिळते. या योजनेसाठी तुम्ही जवळच्या पोस्ट खात्याच्या शाखेत जाऊन खाते उघडू शकतात. तुम्हाला चांगला फायदा हवा असेल तर या योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेवर विविध फायदे मिळतात.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate) ही योजना गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे. या योजनेत अवघ्या 5 वर्षात 20 लाख रुपयांचा परतावा मिळवता येतो. रक्कम जास्त गुंतवल्यास गुंतवणुकदारांना करोडपती सुद्धा होता येते.

पाच वर्षांत चक्रव्याढ व्याजाच्या बळावर हा करिष्मा करता येतो. या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. अगदी 100 रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करता येते. तर कमाल दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तुमच्या क्षमतेनुसार गुंतवणुकीचा पर्याय निवडता येतो.

गुंतवणुकीच्या पटीत त्यावर चक्रवाढ व्याज मिळते. 100 रुपयांपासून दीड लाखांपर्यंत ग्राहकाला या योजनेत गुंतवणूक करता येते. कम्पांऊड इंटरेस्टच्या मदतीने गुंतवणुकदाराची रक्कम कालावधी पूर्ण होण्यापूर्वी मोठी होते. त्यात व्याजाचा फायदा जास्त मिळतो.

या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. गुंतवणुकदाराची इच्छा असेल तर या योजनेचा कालावधी वाढविता येतो. 5 वर्षे या योजनेत आणखी गुंतवणूक करता येते. अतिरिक्त कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास चक्रव्याढ व्याजाचा फायदा मिळतो.

या योजनेत गुंतवणुकदाराला कर सवलतही (Tax Benefit) मिळते. केंद्र सरकारकडून प्राप्तिकराच्या कलम 80C अंतर्गत वजावटीचा लाभ मिळतो. व्याजातून ग्राहकाला होणारा फायदा करपात्र आहे. गुंतवणुकदार व्याज उत्पन्न परताव्यात जमा करू शकतो.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.