नरेंद्र मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर कसोटी, ट्रम्प यांना समजवले तर टळणार 87,47,44,00,000 रुपयांचे नुकसान
PM Narendra Modi U.S. visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. या दौऱ्यात त्यांची डोनाल्ड ट्रम्ससोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे. त्या बैठकीत आयात शुल्का (ट्रम्प टैरीफ) संदर्भात चर्चा होणार आहे. त्यावेळी भारतही अमेरिकेकडून आयात होणाऱ्या काही वस्तूंवरील आयात शुल्क कमी करु शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. ट्रम्प टैरिफची भीती या दौऱ्यात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय धक्कादायक ठरणार आहे. स्टील आणि एल्युमीनियम आयातीलवर 25 टक्के आयात शुल्क लावण्याची ट्रम्प यांची योजनेमुळे भारताचे 87,47,44,00,000 रुपयांचे नुकसान (एक अब्ज डॉलर) होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना हा निर्णय घेण्यापासून परावृत्त करु शकणार का? हा मोठा प्रश्न आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि एल्युमीनियम आयातीवर 25 टक्के आयात शुल्क लावण्याची योजना तयार केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भारताच्या एल्युमीनियम उद्योगापुढे मोठे संकट निर्माण होणार आहे. भारताचे 12 टक्के एल्युमीनियम अमेरिकेला निर्यात होते. ट्रम्प यांच्या निर्णयाच्या भीतीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. 10 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय शेयर बाजारात मेटल स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली. जेएसडब्लू स्टील आणि टाटा स्टीलच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.
त्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. या दौऱ्यात त्यांची डोनाल्ड ट्रम्ससोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे. त्या बैठकीत आयात शुल्का (ट्रम्प टैरीफ) संदर्भात चर्चा होणार आहे. त्यावेळी भारतही अमेरिकेकडून आयात होणाऱ्या काही वस्तूंवरील आयात शुल्क कमी करु शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा प्रस्ताव मान्य केल्यास देशाचे 1 बिलियन डॉलर (87,47,44,00,000 रुपये) होणारे नुकसान टळणार आहे.
अशी होती अमेरिकेला निर्यात
नोव्हेंबर 2024 मध्ये भारताची अमेरिकेला 777 अब्ज डॉलर्सची ॲल्युमिनियम निर्यात होती. ती 2023 मध्ये $6.7 ट्रिलियनच्या एकूण निर्यातीच्या 11.5 टक्के होती. 2018 मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अशाच निर्णयाचा भारताच्या ॲल्युमिनियम निर्यातीवर फारसा परिणाम झाला नाही ही दिलासादायक बाब आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जपान, युरोप, कॅनडा आणि मेक्सिकोवर अधिक परिणाम होणार आहे. परंतु भारत देखील त्याच्या प्रभावापासून लांब राहू शकणार नाही. जादा पुरवठ्यामुळे किमती आणखी घसरण्याची शक्यता आहे.
