Mediclaim Policy | ‘मेडिक्लेम पॉलिसी’ खरेदी करताय? मग ‘या’ 5 गोष्टी आधीच विचारून घ्या!

मेडिक्लेमच्या बर्‍याच अटी देखील आहेत, ज्याकडे लक्ष न दिल्यास आपल्याला मेडिक्लेमचा फायदा घेत नाही.

Mediclaim Policy | ‘मेडिक्लेम पॉलिसी’ खरेदी करताय? मग ‘या’ 5 गोष्टी आधीच विचारून घ्या!
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 4:49 PM

मुंबई : आजकाल मेडिक्लेम पॉलिसी हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ही एक अशी पॉलिसी आहे, ज्याद्वारे आपण आजारी असताना आपल्या स्वत: च्या उपचारासाठी पैसे देण्याची गरज भासत नाही. आपल्याकडे आधीपासूनच मेडिक्लेम पॉलिसी खरेदी केली असल्यास, ती चांगली गोष्ट आहे. परंतु, आपण मेडिक्लेम पॉलिसी घेतली नसेल, तर लवकरात लवकर ती काढून घ्या. मेडिक्लेम पॉलिसीचे बरेच फायदे आहेत. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला पैशाचा ताण देखील येत नाही (Questions related Mediclaim Policy details you need to ask while buying a policy).

तथापि, मेडिक्लेमच्या बर्‍याच अटी देखील आहेत, ज्याकडे लक्ष न दिल्यास आपल्याला मेडिक्लेमचा फायदा घेत नाही. आपण मेडिक्लेम घेण्याचा विचार करत असाल, तर अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपण आधी आधीच नीट विचारून घेतल्या पाहिजेत. तसेच, पॉलिसी खरेदी करण्या आधी अटी आणि शर्तीं काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. त्या ‘5’ महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत, त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पॉलिसीमध्ये समाविष्ट रोगांविषयी माहिती मिळवा.

मेडिक्लेम बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजार आणि रोग. असे बरेच रोग आहेत, जे मेडिक्लेममध्ये समाविष्ट केले जात नाहीत. म्हणूनच, त्या रोगांबद्दल आपण आधीच नीट विचारून घेतले पाहिजे. त्यामुळे जर आपल्याला भविष्यात मेडिक्लेम पॉलिसी वापरण्याची आवश्यकता असेल, तर कोणतीही समस्या उद्भवणार नाही. अशा परिस्थितीत, कोणकोणते रोग यात समाविष्ट आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

वारंवार पॉलिसी बदलू नका

जेव्हा, आपण पॉलिसी खरेदी करता, तेव्हा दीर्घकाळाचा विचार करा. मेडिक्लेम घेण्यापूर्वी त्या कंपनीची संपूर्ण माहिती वाचा आणि एखाद्या चांगल्या कंपनीकडूनच पॉलिसी विकत घ्या. वास्तविक, काही मेडिक्लेममध्ये असा नियम आहे की, हळू हळू त्यात काही रोगा समाविष्ट केले जातात. जर, आपण मधेच पॉलिसी कंपनी बदलत राहिलो, तर बर्‍याच वर्षांपासून प्रीमियम भरल्यानंतरही काही रोग आपल्या पॉलिसीमध्ये समविष्ट केले जाणार नाहीत. म्हणून, एकाच चांगल्या कंपनीची पॉलिसी सुरु ठेवण्याचा प्रयत्न करा (Questions related Mediclaim Policy details you need to ask while buying a policy).

किती दिवसांत समाविष्ट होतील आजार?

जेव्हा आपण पॉलिसी खरेदी करता, तेव्हा आपण त्यासोबतचा नियमांचा तक्ता वाचला पाहिजे. ज्यामध्ये, किती वर्षानंतर पॉलिसीमध्ये कोणते रोग जोडले जातील, याची माहिती दिलेलेई असते. उदाहरणार्थ, ज्या दिवशी आपण पॉलिसी घेता त्या दिवशी अपघात प्रकरणातील क्लेम सुरू होतात. यानंतर, काही रोग एका महिन्यानंतर सामील होतात आणि काही रोग 2 वर्षानंतर सामील केले जातात. अशा परिस्थितीत याबद्दल आधीपासूनच माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.

स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती द्या.

पॉलिसी खरेदी करताना आपल्याला आधीपासूनच काही समस्या असल्यास किंवा कोणतीही शस्त्रक्रिया झाली असल्यास किंवा कोणतीही इतर समस्या असल्यास, त्याची संपूर्ण खरी माहिती द्या. या व्यतिरिक्त आपण जर धुम्रपान करत असाल तर, पॉलिसीच्या वेळी त्याबद्दलही माहिती द्या. तसेच, जर कोणत्याही आजारावर आधीच उपचार सुरू असतील, तर तेही सांगा.

सुविधांविषयी माहिती मिळवा.

मेडिक्लेम पॉलिसीमध्ये बर्‍याचदा रुग्णालयाशी संबंधित अनेक अटी असतात. रुग्णालयाच्या एकूण खाटांची संख्याही बर्‍याच पॉलिसींमध्ये मोजली जाते. तर, रुग्ण म्हणून दाखल होण्यासाठी कोणत्या खोल्या असव्यात, हेही पॉलिसीमध्ये नमूद केलेले असते. बर्‍याच पॉलिसींमध्ये रुग्णाला दाखल करण्यासाठी डिलक्स रूमच्या खर्चाची सुविधा नसते, म्हणून यासंदर्भातील माहिती अगोदरच घ्यावी.

(Questions related Mediclaim Policy details you need to ask while buying a policy)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.