AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakesh Jhunjhunwla | राकेश झुनझुनवाला यांचा हेच ते गोल्डन मंत्र, गिरवल्यास बाजारातून धो धो येईल पैसा

Rakesh Jhunjhunwla Golden tips | राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातून रग्गड कमाई केली आहे. त्यासाठी त्यांची काही धोरणं ठरवली होती. गुंतवणूकदारांसाठी त्यांनी काही गोल्डन टिप्स सांगितल्या आहेत. काय आहेत त्या टिप्स? जाणून घेऊयात

Rakesh Jhunjhunwla | राकेश झुनझुनवाला यांचा हेच ते गोल्डन मंत्र, गिरवल्यास बाजारातून धो धो येईल पैसा
या सुवर्ण नियमांची मनाशी गाठ बांधाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 2:30 PM

Rakesh Jhunjhunwla Golden tips | थेंबे थेंबे तळे साचे, ही मराठीतील म्हण आपण नेहमी म्हणतो, पण अंमलबजावणी किती जण करतात? छोट्या गुंतवणुकीतून (Small Investment) मोठा निधी निर्माण होतो. परंतु, योग्य रणनीती आणि संयम ठेवल्यावरच शेअर बाजारातून (Share Market) योग्य परतावा मिळतो. देशातील दिग्गज गुंतवणूकदार आणि बाजारातील बिग बुल (Big Bull) राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwla) यांनी गेल्या दोन दशकांत या बाजारातून त्यांच्या गोल्डन रुल्समधून बक्कळ पैसा कमविला. पण त्यासाठी त्यांना अभ्यास करावा लागला. त्यांना भारताचे वॉरेन बफे (Warren Buffet) मानले जाते. राकेश झुनझुनवाला यांनी बाजारातून कोट्यवधींची कमाई केली. त्यांनी बाजाराचा स्वभाव, गुंतवणुकीचे फंडे गुंतवणूकदारांसाठी नेहमी खुले ठेवले. त्यांच्या या गोल्डन टिप्सचा अवलंब करून तुम्हीही शेअर बाजारातून कमाई करू शकता. त्यांचा सुवर्ण मंत्र कोणता ते पाहुयात.

मंत्र 1 दीर्घकालीन गुंतवणुकीला महत्व

राकेश झुनझुनवाला यांचा दृष्टीकोन नेहमीच दीर्घकालीन गुंतवणूकीचा राहिला आहे. त्यांनी नवीन गुंतवणूकदारांना नेहमीच दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. अल्पवधीत नफा कमवण्याऐवजी गुंतवणुकीला अनेक पटींनी वाढ करण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा मिळण्यासाठी गुंतवणूकदारांनी थोडी प्रतिक्षा करणे गरजेचे, त्यांना नक्कीच परतावा मिळेल, असा सल्ला झुनझुनवाला यांनी दिला आहे.

मंत्र 2 कंपनीचे मूल्य पहा, शेअरची किंमत नाही

राकेश झुनझुनवाला यांचा हा गोल्डन मंत्र महत्वाचा आहे. त्यांचे मते, गुंतवणूकदारांनी कंपनीचे मूल्य पहावे. त्याच्या शेअरची किंमत किती आहे. ते पाहू नये. कंपनीचे मूल्य अधिक महत्त्वाचे आहे. अनेकदा लोक जास्त किंमतीचे शेअर्स घेण्यास प्राधान्य देतात. पण, गेल्या 1 किंवा 5 वर्षांत कंपनीची कामगिरी कशी आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. कंपनीचा व्यवसाय चांगला असेल, धोरणं चांगली असतील तर शेअर बाजारातील चढ-उतारातही ही कंपनी तुम्हाला काही तरी ते बराच काही परतावा देऊन जाईल.

हे सुद्धा वाचा

मंत्र 3 दुसऱ्याचे डोळे झाकून अनुकरण करु नका

शेअर बाजारात गुंतवणूक करणे नेहमीच बँकांइतके सुरक्षित नाही. मोठा परतावा हवा असेल तर जोखीम आणि धोका ही मोठा आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे कोणी गुंतवणूक करते म्हणून तुम्ही ही डोळे झाकून गुंतवणूक करु नका. ती मंडळी नुकसान सहन करु शकतील. तुम्ही नुकसान सहन करु शकणार नाहीत. कंपनीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच पैसे गुंतवणे महत्त्वाचे आहे. जर कंपनी शेअर बाजारात चांगली कामगिरी करत असेल तर ती तुम्हाला चांगला परतावा देईलच असे नाही. म्हणूनच गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची पार्श्वभूमी तपासणे आणि कंपनीने किती लाभांश दिला आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. शेअर बाजारात लाभांशाला खूप महत्त्व आहे. जर कंपनी दीर्घ काळासाठी नियमितपणे लाभांश देत असेल तर याचा अर्थ असा की तिच्याकडे रोखीची कमतरता नाही. या ठिकाणची गुंतवणूक फायदेशीर ठरते.

मंत्र 5 सर्व पैसे एकाच वेळी गुंतवू नका

तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम आहे, याचा अर्थ तुम्ही एकाच वेळी ती गुंतवावी असा होत नाही. नफा कमावण्याच्या इच्छित वाईट काहीच नाही. परंतु नियम सांगतो की केवळ एक छोटी गुंतवणूक चांगल्या परताव्याची हमी देते. कोणत्याही एका शेअरमध्ये पैसे गुंतवताना, तुमच्या गुंतवणुकीची रक्कम काही भागांमध्ये विभाजित करा आणि वेळोवेळी तो स्टॉक खरेदी करा. तुम्ही खरेदी केलेल्या किंमतीपेक्षा किंमत कमी झाली तर खरेदी सुरुच ठेवा. त्यामुळे तुमची सरासरी खरेदी किंमत कमी होईल आणि फायदा मोठा होईल.

मंत्र 6 कंपन्यांचे कर्जही तपासा

शेअर बाजारात कंपन्यांवर किती कर्ज आहे हे गुंतवणूकदारांनी आधी तपासावे. कर्ज कमी असेल तर कंपन्यांवर रोखीचा दबाव राहत नाही. परंतु, कर्ज जास्त असल्यास, कंपनीच्या मूल्यांकनात कधीही चढ-उतार होतो. गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीच्या कर्जाची संपूर्ण माहिती घ्या.

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!
बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....