AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raksha Bandhan 2024 : लाडक्या बहि‍णीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे खास ‘गिफ्ट’; स्टॉक पासून ते SIP पर्यंत, तिला द्या आर्थिक पाठबळ

Raksha Bandhan 2024: रक्षा बंधनासाठी लाडक्या बहिणीला गिफ्ट देण्याअगोदर या पर्यायांचा विचार जरूर करा. लाडकी बहिणी भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ही भेट योग्य ठरू शकते. ही गुंतवणूक तिचे भविष्य सुखी करू शकते.

Raksha Bandhan 2024 : लाडक्या बहि‍णीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे खास 'गिफ्ट'; स्टॉक पासून ते SIP पर्यंत, तिला द्या आर्थिक पाठबळ
रक्षा बंधनला द्या अनोखे गिफ्ट
| Updated on: Aug 17, 2024 | 12:05 PM
Share

रक्षाबंधन आता एकदम जवळ आले आहे. आता सणांची मालिका सुरू होईल. एकानंतर एक सण येतील. बाजारात चारही दिशांना आनंदाची लहर असेल. रक्षा बंधनाच्या दिवशी भाऊराया लाडक्या बहिणीला काही ना काही भेट वस्तू देतो. जर तुम्ही पण या रक्षाबंधनाला काही गिफ्ट देण्याच्या विचारात असाल तर बहिणीला अगोदर आर्थिक सक्षम करा. तिच्या सुखी भविष्यासाठी या गुंतवणूक योजना चांगला पर्याय ठरू शकतील.

1. बचत खाते द्या उघडून

सध्या कोणत्या ना कोणत्या कारणासाठी बँक खाते आवश्यक झाले आहे. जर तुमच्या बहिणीचे कोणत्याही बँकेत खाते नसेल तर या रक्षाबंधनाला तिचे एखाद्या बँकेत खाते उघडे करा. त्यात तुम्ही एखादी आरडी अथवा एफडी तिच्या नावे सुरु करु शकता. तिला व्यवहारासाठी एक एटीएम कार्ड पण मिळेल. तसेच स्मार्टफोन युपीआयला हे खाते जोडता येईल.

2. स्टॉकमध्ये करा गुंतवणूक

या रक्षा बंधनाला बहिणीच्या नावे डीमॅट खाते उघडा. तिच्या नावे योग्य शेअर खरेदी करा. दरमहिन्याला काही शेअर तिच्या खात्यात जमा करण्याची तरतूद करा. त्यासाठी तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या. त्यानंतर अशा प्रकारची गुंतवणूक करा.

3. मुदत ठेव योजनेत रक्कम गुंतवा

जर बहिणीच्या शिक्षणासाठी अथवा लग्नासाठी पैसे जमा करायचे असेल तर एखादी मुदत ठेव योजनेत तिच्या नावे पैसे गुंतवा. कोणत्याही बँकेत तिच्या नावे मुदत ठेव योजनेत रक्कम गुंतवा. त्यामुळे तिला एका ठराविक वेळेत मोठी रक्कम मिळू शकते.

4. म्युच्युअल फंडात करा गुंतवणूक

सध्या म्युच्युअल फंड हा पण गुंतवणुकीचा एका चांगला पर्याय ठरत आहे. जर तुम्ही मोठी रक्कम गुंतवू इच्छित नसाल तर बहिणीच्या नावे म्युच्युअल फंडमध्ये एक ठराविक रक्कम गुंतवणूक करा. अथवा एकरक्कमी गुंतवणूक करा. भविष्यात तिच्यासाठी ही गुंतवणूक फायदेशीर ठरेल. त्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.

5. सोने-चांदीतील गुंतवणूक

सोने आणि चांदी खरेदी ही भारतीय यांची परंपरा आहे. इतर ठिकाणी गुंतवणूक करायची नसेल तर बहिणीला सोने अथवा चांदीचे नाणे गिफ्ट द्या. तिच्यासाठी अंगठी अथवा एखादा दागिना खरेदी करा. अथवा गोल्ड बाँड, ईटीएफ आणि इतर गुंतवणूक पर्याय पण आहेत.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं