AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SMFG इंडिया क्रेडिटच्या सीईओ पदी रवी नारायणन, 3 दशकांहून मोठा अनुभव

SMFG India Credit : एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड, रिझर्व्ह बँकेकडे एक नोंदणीकृत आणि सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुप (एसएमएफजी) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही एक आघाडीची एनबीएफसी - गुंतवणूक आणि क्रेडीट कंपनी (NBFC-ICC) असून ती 2007 पासून देशात कार्यरत आहे.

SMFG इंडिया क्रेडिटच्या सीईओ पदी रवी नारायणन, 3 दशकांहून मोठा अनुभव
रवी नारायणन
| Updated on: Aug 13, 2025 | 8:50 AM
Share

ॲक्सिस बँकेचे माजी समूह संचालक (रिटेल लायबिलिटीज, ब्रँच बँकिंग आणि उत्पादने) रवी नारायणन यांची एसएमएफजी इंडिया क्रेडिटचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये फुलटर्नच्या नॉन बँकिंग फायनान्स ब्रँच सुमितोमो मित्सुई फायनेन्शिअल ग्रुपने (SMFG) अधिग्रहण केले होते. त्यानंतर जे मोठे बदल करण्यात आले. त्यातील हा एक बदल आहे. वित्ती कंपन्यांपैकी एक (NBFC) एसएमएफजी इंडिया क्रेडीटचे एयुएम 60 हजार कोटींपेक्षा अधिक आहे. तर ग्राहकांची संख्या 30 लाखांपेक्षा अधिक आहे.

आता कंपनीने रवी नारायणन यांची सीईओ पदी नियुक्ती केली आहे. 28 ऑगस्ट 2025 पासून ते पदभार संभाळतील. ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेच्य वरीष्ठ पदावर त्यांनी काम केले आहे. रवी नारायणन यांना रिटेल आणि शाखा वितरणात 3 दशकांहून अधिक काळाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी अ‍ॅक्सिस सिक्युरिटीज आणि अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडच्या संचालक मंडळावरही काम केले आहे.

काय म्हणाले अध्यक्ष

SMFG इंडिया क्रेडिट के अध्यक्ष राजीव कन्नन यांनी सांगितले की रवी नारायणन यांना एसएमएफजी इंडिया क्रेडीटच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मला विश्वास आहे की, त्यांचा रिटेल आणि शाखा वितरणातील अनुभव एसएमएफजी इंडिया फ्रँचायजीच्या व्यवहार वाढीसाठी फायदेशीर ठरेल. शेअरधारकांसाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरेल.

SMFG इंडिया सोबत काम करण्यास उत्सुक

आपल्या नवीन भूमिकेविषयी एसएमएफजी इंडिया क्रेडीटचे सीईओ रवी नारायण यांनी सांगितले की, आम्ही आता अधिक मजबुतीने उभे राहु. रिटेल व्यवसायाच्या वृद्धीसाठी मी SMFG इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत काम करेल. देशभरातील विविध शाखांद्वारे ग्राहकांशी आता अधिक दृढ संबंध प्रस्थापित करू. शाश्वत विकासाला चालना देणे, धोरणात्मक भागीदारी, सर्व ग्राहकांना सेवा प्रदान करण्यासाठी जोखीम आणि अनुपालन करण्यात येईल. मला एसएमबीसी समूहात दाखल झाल्याने आनंद होत आहे. या समूहाला 400 हून अधिक काळाचा इतिहास आहे. आता हा समूह भारतात गुंतवणुकीचा विस्तार करणार आहे.

काय आहे एसएमएफजी इंडिया क्रेडिट?

एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड, रिझर्व्ह बँकेकडे एक नोंदणीकृत आणि सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुप (एसएमएफजी) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही एक आघाडीची एनबीएफसी – गुंतवणूक आणि क्रेडीट कंपनी (NBFC-ICC) असून ती 2007 पासून देशात कार्यरत आहे.

एसएमएफजी इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड, ही तिची सहायक कंपनी आहे. या कंपनीला एसएमएफजी हाऊस पॉवर या नावाने ओळखले जाते. कंपनीच्या देशभरात 1005 शाखा आहेत. या शाखा 670 हून अधिक शहरांना आणि 70 हजारांहून अधिक गावांशी जोडल्या गेल्या आहेत. 25 हजारांहून अधिक कर्मचारी ग्राहकांच्या सेवेते तत्पर आहेत. ही कंपनी किरकोळ आणि लघु व्यवसायिक कर्जदारांना कर्ज मिळवून देते. त्यामुळे अल्प, मध्यम उत्पन्न गटातील लोकांना व्यवसाय उभारताना आर्थिक चणचण भासत नाही.

एसएमएफजी इंडिया क्रेडीट आणि एसएमएफजी हाऊस पॉवरसह देशभरात एसएमई फायनेन्सिंग, कमर्शियल वाहनं आणि दुचाकी वाहनांसाठी कर्ज, गृहकर्ज, घर सजावट कर्ज, मालमत्ता, शेअर्सवर कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि ग्रामीण उपजीविका कर्ज उपलब्ध करुन देते.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.