एकाच मोबाईल क्रमांकाशी जोडली का अनेक बँक खाती? RBI चे हे धोरण आणेल अडचणीत

RBI Policy | बँक खात्यांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नियम अजून कडक करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी KYC नियम कडक करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बँका त्यांच्या ग्राहकांच्या हितासाठी व्हेरिफिकेशन प्रक्रिया अजून कडक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांच्या डोक्याला ताप होऊ शकतो.

एकाच मोबाईल क्रमांकाशी जोडली का अनेक बँक खाती? RBI चे हे धोरण आणेल अडचणीत
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 2:49 PM

नवी दिल्ली | 5 March 2024 : काय तुमच्याकडे पण एका अधिक बँक खाती आहेत? तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जेव्हा तुम्ही बँक खाते उघडण्यासाठी जाता. त्यावेळी तुमच्याकडून एक KYC फॉर्म भरुन घेतल्या जातो. त्यामध्ये खात्याची पडताळणी, व्हेरिफिकेशनसंबंधीची आणि ग्राहकांची माहिती भरुन घेण्यात येते. त्यामुळे एकापेक्षा अधिक खाती असतील आणि त्या सर्वांना एकच मोबाईल क्रमांक लिंक असेल तर आता नवीन नियमानुसार मनस्ताप होऊ शकतो. भारतीय रिझर्व्ह बँक, इतर बँकांशी सल्लामसलत करुन एक नवीन व्यवस्था आणण्याच्या विचारात आहे. त्याचा फटका बसू शकतो.

मोठा बदल करु शकते RBI

खातेदारांची बँक खाती सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक, इतर बँकांशी हात मिळवून KYC नियम कडक करु शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बँका ग्राहकांना व्हेरिफिकेशनसाठी अजून कडक नियम करु शकतात. त्यांना दोन मोबाईल क्रमांक द्यावे लागू शकतात. तसेच सर्व खात्यांची एकत्रित माहिती जमा करण्याचे धोरणपण कदाचित राबविण्यात येऊ शकते.

हे सुद्धा वाचा

कोणाला लागू होईल नियम?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरबीआयच्या या नियमाचा परिणाम एकच क्रमांक अनेक खात्यांशी जोडणाऱ्या ग्राहकांना, अनेक बँक खातेदारांवर अधिक होईल. त्यांना आता यापुढे KYC फॉर्ममध्ये अजून एक मोबाईल क्रमांक जोडावा लागणार आहे. ग्राहकांना संयुक्त खात्यात पण एक अतिरिक्त, पर्यायी मोबाईल क्रमांक जोडावा लागेल. अर्थ सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या नेतृत्वाखालील एक समिती पूर्ण आर्थिक क्षेत्रात नवीन नियम लागू करण्यासाठी काम करत आहे. फिनटेक कंपन्या नियमांचे उल्लंघन करत असल्याने त्यासाठी कडक पावलं उचलण्यात आली आहे.

या कामासाठी मिळेल मदत

याप्रकरणी एका अधिकाऱ्याने इकोनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त खात्यासाठी पॅन, आधार आणि युनिक मोबाईल क्रमांक सारख्या मल्टि लेव्हल सेकेंडरी आयडेंटिफिकेशन मेथडवर विचार करत आहे. दुसऱ्या सुरक्षाविषयक ओळख पडतळणीसाठी कोणत्याही व्यक्तीच्या अनेक खात्याची माहिती घेण्यासाठी परवानगी घेण्यात येईल. तसेच सर्व खात्याची केवायसी कागदपत्रे पण सारखी ठेवण्यात येतील.

Non Stop LIVE Update
मतदान केलं अन् सध्याच्या राजकारणावर सुबोध भावेंनी एका वाक्यात म्हटलं..
मतदान केलं अन् सध्याच्या राजकारणावर सुबोध भावेंनी एका वाक्यात म्हटलं...
तरच मतदान करणार...बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
तरच मतदान करणार...बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार.
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल.
अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण.
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?.
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.