रेपो रेट ‘जैसे थे’, कर्जाचा EMI कमी करण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केलेली नाही. असं असताना कर्जाचे व्याजदर कमी होणार नाहीत, पण तरीही तुम्ही EMI कमी करू शकता. ट्रिक जाणून घ्या.

रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही आताचा मोठी बातमी आहे. कर्ज घेणाऱ्या किंवा कर्जाचा EMI भरणाऱ्या लोकांचे याकडे लक्ष लागून होते. पण, रेपो दर कायम ठेवण्यात आले आहेत. आता प्रश्न हा आहे की, कर्जाचा EMI देखील बदलणार नाही. पण चिंता करू नका. तुमच्या कर्जाचा EMI कमी होऊ शकतो. यासाठी काय करावे लागेल, हे पुढे जाणून घ्या.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतधोरण समितीची (MPC) बैठक आज संपली असून, त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 5.50 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा निर्णय कर्ज घेणाऱ्या किंवा कर्जाचा EMI भरणाऱ्या लोकांना कोणताही दिलासा देणार नाही, पण जर तुम्ही तुमच्या कर्जाच्या उच्च EMI मुळे त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला एका अशा मार्गाबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या कर्जाचा EMI कमी करू शकता आणि तुमचे लाखो रुपये वाचवू शकता. चला जाणून घेऊया.
तुमच्या कर्जाचा EMI कमी करण्यासाठी तुम्ही तुमचे लोन अशा बँकेत ट्रान्सफर करू शकता ज्याचा व्याजदर तुमच्या कर्जाच्या व्याजदरापेक्षा कमी आहे.
EMI कमी करण्यासाठी कर्ज ट्रान्सफर
तुमच्या कर्जाचा EMI कमी करण्यासाठी तुम्ही तुमचे लोन अशा बँकेत ट्रान्सफर करू शकता जिथे व्याजदर कमी आहेत. मात्र, यासाठी तुम्हाला बँकेत लोन ट्रान्सफरसाठी चार्ज द्यावा लागतो, पण कमी व्याजदर मिळवून तुम्ही लाखो रुपयांची बचत करू शकता.
‘या’ परिस्थितीत कर्ज ट्रान्सफर करू नका
जर तुमच्याकडे कर्जाचा कालावधी कमी असेल तर ही प्रक्रिया लांबलचक असल्याने कर्ज ट्रान्सफर करणे टाळावे. अशावेळी तुम्हाला जास्त शुल्क भरावे लागू शकते, ज्यामुळे तुमची बचत होणार नाही.
त्याचबरोबर दुसऱ्या बँकेचा व्याजदर आणि तुमच्या बँकेचा व्याजदर यात 0.75 टक्क्यांपर्यंत तफावत असेल तर ट्रान्सफर करण्याचा विचार करा. व्याजदरात थोड्याफार फरकाने तुम्ही फारशी बचत करू शकणार नाही आणि तुमचे पैसे ट्रान्सफर चार्जमध्ये जातील.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
