RBI ने अनेक बँकांनंतर आता ‘या’ बँकेवर ठोठावला दंड, जाणून घ्या कारण काय?

संचालक, नातेवाईक आणि कंपन्यांना कर्ज देण्याबाबत आणि अॅडव्हान्ससंदर्भातील बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने 27 जुलै रोजी हा दंड ठोठावलाय.

RBI ने अनेक बँकांनंतर आता 'या' बँकेवर ठोठावला दंड, जाणून घ्या कारण काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेकडे चलनातील नाणी मोठ्याप्रमाणावर पडून असल्यामुळे ही नाणी बँकांमधून वितरीत करण्याची योजना आखण्यात आली आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्वोदय वाणिज्यिक सहकारी बँकेला (Sarvodaya Commercial Co-operative Bank) 1 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावलाय. संचालक, नातेवाईक आणि कंपन्यांना कर्ज देण्याबाबत आणि अॅडव्हान्ससंदर्भातील बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने 27 जुलै रोजी हा दंड ठोठावलाय.

रिझर्व्ह बँकेनं अधिकारांचा उपयोग करून ठोठावला दंड

रिझर्व्ह बँकेने कायदा 1949 च्या कलम 46 (4) (i) आणि बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 56 च्या कलम 47 A (1) (C) सह रिझर्व्ह बँकेनं अधिकारांचा उपयोग करून हा दंड ठोठावलाय. ही कारवाई नियामक अनुपालन कमतरतेवर आधारित आहे. बँक आणि त्याच्या ग्राहकांमधील कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह ठेवण्यासाठी नाही.

‘या’ कारणासाठी बँकेकडून दंड आकारला जातो

31 मार्च 2018 रोजी रिझर्व्ह बँकेने बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात बँकेची वैधानिक तपासणी केली आणि त्यावर आधारित अहवाल आणि संबंधित सर्व पत्रव्यवहाराची तपासणी, इतर गोष्टींद्वारे ही बाब उघडकीस आली. त्यात आरबीआयच्या सूचनांचे पालन झाले नसल्याचं समोर आलं.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे त्यांना दंड भरावा लागणार

रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे त्यांनी दंड भरावा, याबाबत पुन्हा बँकेला नोटीस पाठविण्यात आली. त्यानंतर बँकेच्या नोटिशीला उत्तर, वैयक्तिक सुनावणीदरम्यान करण्यात आलेल्या सबमिशन आणि पुढील सबमिशनचा विचार केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने असा निष्कर्ष काढला की, आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याचे आरोप खरे असल्याचे सिद्ध झाले आणि तेच आर्थिक दंड थोपवणे आवश्यक होते. यापूर्वीही नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल हैदराबादस्थित आंध्र प्रदेश महेश सहकारी अर्बन बँकेला रिझर्व्ह बँकेने 112.50 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय.

संबंधित बातम्या

सरकारकडून घर बसल्या 15 लाख रुपये जिंकण्याची संधी, फक्त हे काम करा

LIC चे 3 सर्वोत्कृष्ट बेस्ट चाइल्ड प्लान, योजनांबद्दल जाणून घ्या सर्व काही

RBI slams Sarvodaya Commercial Co-operative Bank bank after several banks, find out why?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI