Record food production : चालू आर्थिक वर्षात विक्रमी धान्य उत्पादनाचे लक्ष्य; पावसाने साथ दिल्यास 32.8 कोटी टन धान्य निर्मितीचा अंदाज

गेल्या दोन-तीन वर्षांपासून देशात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये केंद्राकडून 32.8 कोटी टन विक्रमी (Record food production) धान्य उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गेल्या वर्षाच्या तुलनेत 3.8 टक्क्यांनी अधिक आहे.

Record food production : चालू आर्थिक वर्षात विक्रमी धान्य उत्पादनाचे लक्ष्य; पावसाने साथ दिल्यास 32.8 कोटी टन धान्य निर्मितीचा अंदाज
बासमती तांदळाच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 8:19 AM

नवी दिल्ली : गेल्या दोन-तीन वर्षांपासून देशात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये केंद्राकडून 32.8 कोटी टन विक्रमी (Record food production) धान्य उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गेल्या वर्षाच्या तुलनेत 3.8 टक्क्यांनी अधिक आहे. 2021-22 या वर्षात येत्या जूनपर्यंत 31 कोटी 60.6 लाख टन धान्याचे (food) उत्पादन होऊ शकते असा कृषी मंत्रालयाचा अंदाज आहे. यंदा झालेल्या धान्य उत्पादनाच्या आधारावर पुढील वर्षी म्हणजे 2022-23 मध्ये केंद्राकडून देशात 32.8 कोटी टन विक्रमी धान्य निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. याबाबत बोलताना कृषी आयुक्त ए. के. सिंह (Agriculture Commissioner Singh) यांनी म्हटले आहे की, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. अपेक्षेप्रमाणे पाऊस पडल्यास मोठ्या प्रमाणात धान्य उत्पादन होऊ शकते, वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षासाठी केंद्राकडून 32.8 कोटी धान्य उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जे की गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.8 पटीने अधिक आहे. पाऊस चांगला राहिल्यास आपण हा टप्पा सहज गाठू शकतो.

खंताचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध

पुढे बोलताना सिंह म्हणाजे की चालू खरीप हंगामात सोयाबीन सोडल्यास इतर पिकांचे बी- बियाणे मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच खतांचा साठा देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, खतांच्या वितरणावर केंद्राची नजर असणार आहे. खतांचा काळा बाजार होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असून, काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. परवडणाऱ्या दरात शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. तसेच सोयाबीनच्या बियाण्याचा पुरवठा वाढवण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. यंदा पावसाने साथ दिल्यास अपेक्षेप्रमाणे धान्याचे उत्पादन होऊ शकते.

साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ

यंदा देशात साखरेचे उत्पादन विक्रमी झाले आहे. सप्टेंबर 2022 मध्ये संपणाऱ्या मार्केटिंग वर्षापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन 13 टक्क्यांनी वाढून 3.5 कोटी टनावर जाईल असा अंदाज आहे. तसेच यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत 95 लाख टन साखरेच्या निर्यातीची अपेक्षा आहे. खाद्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यंदा राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन झाले असून, साखर निर्मितीला वेग आला आहे. रशिया, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय साखरेच्या निर्यातीत वाढ होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Sagwan Farming : या झाडाची लागवड करून झटपट व्हा श्रीमंत, काही वर्षांतच बनणार करोडपती !

today Petrol Diesel rate: कच्च्या तेलाचे दर वाढले, पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आजचे दर

SHARE MARKET: सेन्सेक्स 700 अंकांनी गडगडला, गुंतवणुकदारांचा पाय खोलात, 2 दिवसांत 6 लाख कोटींवर पाणी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.