Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

85 लाखाच्या होम लोनवरील 40 लाख वाचणार, कसे? घ्या जाणून ट्रिक्स

दिवसेंदिवस वाढते खर्च आणि वाढते व्याज दर लक्षात घेता, गृह कर्जाचे प्रीपेमेंट हा एक प्रभावी उपाय आहे. या लेखात, 85 लाखांच्या गृहकर्जावर 10% प्रीपेमेंट करून कसे 40.23 लाख रुपये आणि 65 ईएमआय हप्ते वाचवता येतो हे स्पष्ट केले आहे. प्रीपेमेंटची पद्धत आणि तिचे गणित समजून घेऊन, तुम्ही तुमचे आर्थिक ओझे कमी करू शकता आणि भविष्यातील आर्थिक नियोजन सुलभ करू शकता. तज्ज्ञांच्या सल्ल्याने हे प्लॅनिंग अधिक परिणामकारक बनवता येते.

85 लाखाच्या होम लोनवरील 40 लाख वाचणार, कसे? घ्या जाणून ट्रिक्स
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 7:20 PM

दिवसे न् दिवस जमीन आणि फ्लॅटचे भाव वाढत आहेत. जर तुम्ही फ्लॅट खरेदी केला आणि बँकेतून लोन घेतलं तर त्यावर तुम्हाला व्याजही मोठ्या प्रमाणात द्यावं लागतं. हे लोन फेडता फेडता तुमचं आयुष्य खर्ची होतं. हातात काहीच पुंजी राहत नाही. पण तुमचं लोन कमी करायची एक ट्रिक्स आहे. ती तुम्ही अंमलात आणली तर त्याचा तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही 85 लाखांचं गृहकर्ज घेतलं असेलत र त्यातवरील 40.23 लाख रुपयांची तुम्ही बचत कराल एवढी ही महत्त्वाची ट्रिक्स आहे. तसेच तुमचा ईएमआय पाच महिने आधीच पूर्णही होील. त्यामुळे तुम्ही ही ट्रिक बघाच आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तिचा अंमलही करा.

होम लोनचे अनेक प्रकार असतात. समजा तुम्ही घर खरेदी करण्यासाठी 85 लाखाचं लोन 25 वर्षासाठी घेतलंय. त्यावर तुम्हाला 9.5 टक्के व्याज द्यावं लागत आहे. आणि महिन्याचा हप्ता 4,264 असेल. तर तुम्हाला अंदाजित व्याज 1,37,79,265 द्यावं लागेल. पण यावर तुम्ही 10 टक्के प्रीपेमेंट केल्यावर तुमचे 40.23 लाख रुपये कसे वाचतील हे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. तसेच तुम्ही 10 टक्के प्रीपेमेंट केल्यावर तुमचा 65 महिन्यांचा ईएमआयही वाचणार आहे.

प्रीपेमेंट

10 टक्के प्रीपेमेंटचा अर्थ तुम्ही किती रुपयांचं लोन घेता. त्यात ईएमआयच्याशिवाय 10 टक्के मूळ रकमेचा समावेश आहे. असं केल्याने तुमचे पैसेही वाचतील आणि वेळही. जेव्हा तुम्ही लोन घेता तेव्हा तुमचा ईएमआय तुम्ही तुमच्या महिन्याच्या रकमेनुसार ठरवता. पण एका ठराविक काळाने तुमचा पगार वाढतो. अशावेळी तुम्ही तुमचं ओझं कमी करू शकता. त्यात प्रीपेमेंटचं एक चांगलं ऑप्शन आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे गणित?

तुम्ही जितका प्रीपेमेंट करता तितकीच रक्कम मूळ रकमेतून कमी होते. याचं गणित कसं असतं ते समजू. तुम्ही 25 वर्षासाठी 9.5 टक्के व्याज दराने 85 लाख रुपये कर्ज घेतले आहे, असं समजा. अशा परिस्थितीत प्रीपेमेंटची रक्कम 8,50,000 रुपये होईल. आणि ही तीन हप्त्यात द्यावी लागेल. या हप्त्याच्या लोनच्या कालावधीच्या हिशोबाने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या वर्षात जमा केलं जाईल. उदाहरणार्थ – लोन नोव्हेंबर 2024मध्ये सुरू होईल. तेव्हा 2,83,333 रुपयांचा पहिला हप्ता नोव्हेंबर 2027मध्ये जमा करावा लागेल. दुसरा हप्ता डिसेंबर 2028 मध्ये द्यावा लागेल. तिसरा हप्ता जानेवारी 2029मध्ये द्यावा लागेल. असं केल्याने व्याजात 40,22,753 रुपयांची बचत होईल. त्यानुसार तुमचं कर्ज 65 महिन्याआधीच फिटेल.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.