मोठी बातमी: Reliance JIO कडून मुंबई आणि पुण्यात 5G नेटवर्कच्या टेस्टिंगला सुरुवात

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Rohit Dhamnaskar

Updated on: Jun 16, 2021 | 2:21 PM

Reliance GIO 5G network | हैदराबादमध्येही रिलायन्स 5G चाचणीसाठी तयारी करत आहे. मात्र, त्यासाठी तंत्रज्ञान भागीदार अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. देशात 5G नेटवर्क व्यावसायिक स्वरुपात उपलब्ध करुन देण्यापूर्वी या चाचण्या रिलायन्स जिओसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जात आहेत.

मोठी बातमी: Reliance JIO कडून मुंबई आणि पुण्यात 5G  नेटवर्कच्या टेस्टिंगला सुरुवात
5G नेटवर्क

मुंबई: रिलायन्स जिओने देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्कच्या चाचणीला सुरुवात केली आहे. यासाठी रिलायन्स जिओने जगातील बड्या कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. त्यानुसार सध्या मुंबईत रिलायन्स जिओ स्वत:च्या बळावर 5G चाचण्या करत आहे. तर पुण्यात रिलायन्सकडून नोकिया कंपनीची मदत घेतली जात आहे. तर दिल्ली आणि गुजरातमध्ये जिओकडून अनुक्रमे एरिक्सन आणि सॅमसंगच्या मदतीने संयुक्तपणे 5G नेटवर्कच्या चाचण्या सुरु आहेत. (Reliance JIO started 5G network testing in Mumbai and Pune)

याशिवाय, हैदराबादमध्येही रिलायन्स 5G चाचणीसाठी तयारी करत आहे. मात्र, त्यासाठी तंत्रज्ञान भागीदार अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. देशात 5G नेटवर्क व्यावसायिक स्वरुपात उपलब्ध करुन देण्यापूर्वी या चाचण्या रिलायन्स जिओसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जात आहेत. यासाठी आणखी बराच अवधी लागणार आहे. कारण केंद्र सरकारने अजूनही 5G नेटवर्कसाठी लागणारा परवाना आणि लहरींचा (स्पेक्ट्रम) लिलाव केलेला नाही.

सध्या Reliance JIO कडून mmWave आणि मिड-बैंड स्पेक्ट्रमच्या माध्यमातून नेटवर्क आणि उपकरणांची चाचणी केली जात आहे. जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडने 5G तंत्रज्ञान आणि प्राथमिक रचना तयार केली आहे. यामध्ये रेडिओ टेक्नॉलॉजी, मॅक्रो बेस स्टेशन, इनडोर सेल आणि कोर सॉफ्टवेअर नेटवर्कचा समावेश आहे.

रिलायन्स जिओचे एअरटेलच्या पावलावर पाऊल

रिलायन्स जिओपूर्वी भारती एअरटेलने गुडगावमध्ये 3500 मेगाहर्ट्ज मिड-ब्रांड स्पेक्ट्रमच्या सहाय्याने 5G टेस्टिंगला सुरुवात केली होती. दूरसंचार विभागाकडून एअरटेलला मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि दिल्ली या भागांसाठी स्पेक्ट्रम वितरीत करण्यात आले होते. तर दुसरीकडे रिलायन्स जिओनेही 57,123 कोटी रुपये खर्च करुन 22 सर्कलमध्ये स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत. त्यामुळे आगामी काळात रिलायन्स जिओला 5G नेटवर्क पुरवण्यास मदत होणार आहे. याशिवाय, कनेक्टिव्हीटी सुधारण्यासाठी रिलायन्स जिओने महत्वाच्या सर्कलमध्ये जादा स्पेक्ट्रम विकत घेतले होते.

संबंधित बातम्या:

Reliance Jio Phone Offer : केवळ 1999 रुपयात जिओ फोन, 2 वर्ष अनलिमिटेड कॉलिंग

Reliance Jio | रिलायन्स जिओचे तीन सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, जाणून घ्या डिटेल माहिती

Reliance Jio GigaFiber : किंमत, पॅकेज आणि सर्व काही…

Reliance JIO started 5G network testing in Mumbai and Pune

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI