AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Repo Rate कमी झाला की वाढला? RBI चा मोठा फैसला, मिळाला का कर्जदारांना दिलासा?

RBI on Repo Rate : जगात दोन युद्ध सुरू आहेत. शेअर बाजाराला झटके बसत आहे. तर अमेरिकन केंद्रीय बँकेने व्याजदरात कपात केली आहे. अशावेळी भारतीय रिझर्व्ह बँके रेपो दर वाढवणार की कमी करणार याविषयीची चर्चा रंगली होती. 7 ऑक्टोबर रोजी पतधोरण समितीची बैठक सुरू झाली होती. आज या बैठकीत मोठा निर्णय झाला.

Repo Rate कमी झाला की वाढला? RBI चा मोठा फैसला, मिळाला का कर्जदारांना दिलासा?
रेपो दर वाढला की कमी झाला?
| Updated on: Oct 09, 2024 | 11:15 AM
Share

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आज संपली. 7 ऑक्टोबरपासून ही बैठक सुरू झाली होती. RBI on Repo Rate : जगात दोन युद्ध सुरू आहेत. शेअर बाजाराला झटके बसत आहे. तर अमेरिकन केंद्रीय बँकेने व्याजदरात कपात केली आहे. अशावेळी भारतीय रिझर्व्ह बँके रेपो दर वाढवणार की कमी करणार याविषयीची चर्चा रंगली होती. आज बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय जाहीर केला. ईएमआय कमी झाला नसला तरी तो वाढणार नाही, इतकाच काय तो दिलासा ग्राहकांना मिळाला आहे. रेपो रेट सलग दहाव्यांदा जैसे थे आहे. सध्या रेपो दर हा 6.50 टक्क्यांवर आहे.

5 सदस्यांचा रेपो दर बदलाला विरोध

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीचा निर्णय पत्रकार परिषदेत सांगितला. त्यानुसार पतधोरण समितीत 3 नवीन सदस्याची वर्णी लागली आहे. जागतिक बाजार, भारतीय अर्थव्यवस्थेचा सारासार विचार केल्यानंतर 6 मधील 5 सदस्यांनी व्याज दरात कुठलाही बदल करण्यास विरोध केला. त्यांनी रेपो दर जैसे थे ठेवण्याची वकिली केली. परिणामी रेपो दरात कुठलाही बदल करण्यात आला नाही. जागतिक बाजारात संभ्रमावस्था आहे. देशात महागाई नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहे. या सर्व प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे.

फेब्रुवारी 2023 जैसे थे दर

देशात सर्वसामान्यांची महागाईपासून सूटका झालेला नाही. महागाईचा कहर सुरू आहे. रेपो दर कमी झाला तर निदान कर्जाचा हप्ता तरी कमी होईल आणि गाठीशी काही पैसे राहतील अशी नागरिकांची अपेक्षा होती. पण ग्राहकांना बचत करणे अवघडच असल्याचे या निर्णयामुळे समोर आले आहे. 10 व्यांदा आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दरात कोणताच बदल केला नाही. फेब्रुवारी 2023 पासून रेपो रेटमध्ये कोणताच बदल झालेला नाही. आरबीआयने दीर्घकाळांपर्यंत रेपो दरात कोणताही बदल केले नसल्याचे गेल्या 25 वर्षांतील हे मोठे उदाहरण आहे.

रेपो दर 6.5 टक्के कायम

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आज 9 ऑक्टोबर रोजी संपली. त्यानंतर आता गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दराची घोषणा केली. कर्जाचा हप्ता कमी होण्याची आशा बाळगून असलेल्या ग्राहकांना केंद्रीय बँकेने धक्का दिला. रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेपो दर हा पूर्वीसारखाच 6.5 टक्के ठेवण्यात आला. त्यामुळे ईएमआयचा हप्ता कायम राहणार आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.