AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITC Demerger : डिमर्जर स्टोरीत ट्विस्ट! हॉटेल व्यवसायावरच टांगती तलवार, पेच वाढला

ITC Demerger : हॉटेल व्यवसायाला उभारी देण्यासाठी आयटीसीने विलगीकरणाची घोषणा केली खरी, पण आता या डिमर्जरच्या स्टोरीत नवीन ट्विस्ट आला आहे. ब्रिटिश अमेरिकन टोबॅको कंपनी यामुळे पेचात अडकली आहे.

ITC Demerger : डिमर्जर स्टोरीत ट्विस्ट! हॉटेल व्यवसायावरच टांगती तलवार, पेच वाढला
| Updated on: Jul 30, 2023 | 8:55 AM
Share

नवी दिल्ली | 30 जुलै 2023 : टोबॅको उत्पादनात अग्रेसर असलेल्या आयटीसीने (ITC Company) गेल्या दशकात आपला पसारा प्रचंड वाढवला. एफएमसीजी बाजारात (FMCG) कंपनीने दबदबा वाढवला. थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून अनेक उत्पादनाचे ब्रँड बाजारात उतरवले. कंपनी हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून मांड ठोकून आहे. हॉटेल व्यवसायाला (Hotel Business) उभारी देण्यासाठी आयटीसीने विलगीकरणाची घोषणा केली. त्यानंतर बाजारात आयटीसीचा शेअर गडगडला. डिमर्जरचा फायदा होत असतानाही शेअरधारकांनी नाखूशी दर्शवली. बाजाराचा कल आयटीसीने लगेच हेरला. त्यातच एक अपडेट समोर आल्याने आयटीसीने आता नवीन खेळी खेळली आहे. त्यामुळे ब्रिटिश अमेरिकन टोबॅको कंपनी पेचात सापडली आहे.

काय घडली घडामोड

गेल्या आठवड्यात आयटीसीने हॉटेलिंग व्यवसाय स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला. देशात अनेक मेट्रो शहरात आणि पर्यटनस्थळी आयटीसीच्या हॉटेल्स आहेत. हॉटेल व्यवसाय तेजीत आणणे आणि एफएमसीजी व्यवसायात अजून भरारी घेण्यासाठी डिमर्जरचा निर्णय घेण्यात आला. दोन उद्देश साध्य करण्यासाठी कंपनीने डिमर्जरची घोषणा केली.

घोषणेनंतर शेअर नरमला

आयटीसी सिगरेट उत्पादनापासून गव्हाचे पीठ, दाळी, बिस्किट, आयटी पेपर आणि इतर अनेक उत्पादनात अग्रेसर आहे. हॉटेल व्यवसाय स्वतंत्र करण्याचा निर्णय कंपनीने जाहीर केला. पण त्याचा विपरीत परिणाम शेअर बाजारात दिसून आला. गेल्या सोमवारी कंपनीचा शेअर 3.87 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 471 रुपयांवर घसरला होता.

उपकंपनी करणार व्यवस्थापन

विलगीकरणानुसार, हॉटेल व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र उपकंपनीचे गठण करण्यात येईल. यामध्ये आयटीसीचे 40 टक्के तर 60 टक्के हिस्सा शेअरधारकांचा असेल. याविषयीच्या प्रस्तावाला बोर्डाने मंजुरी पण दिली.

अशी असेल किंमत

नवीन उपकंपनी स्थापन होईल. आयटीसी हॉटेल्सच्या शेअरची किंमत 15 ते 27 रुपये असण्याची शक्यता आहे. आयटीसीचे मार्केट कॅप जोरदार आहे. कंपनीची मार्केट साईज 5.84 ट्रिलियन रुपये आहे. 28 जुलै रोजी बाजार बंद झाला तेव्हा हा शेअर 467.65 रुपयांवर बंद झाला.

आता अडचण काय

आता या विलगीकरणाच्या कथेत नवीन ट्विस्ट आले आहे. कथानकाला नवीन वळण मिळाले आहे. ब्रिटिश अमेरिकन टोबॅको कंपनीचा (British American Tobacco Company-BAT)आयटीसीमध्ये 29 टक्के वाटा आहे. डिमर्जरची पटकथा आकार घेत असतानाच अमेरिकन टोबॅको कंपनीने नवीन घडामोडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बॅटचे आयटीसी हॉटेलमध्ये 17.4 टक्के वाटा आहे. त्याविषयी बॅटने घेतलेला निर्णय आयटीसीला अडचणीचा वाटत आहे.

वाटा विकणार

ब्रिटिश अमेरिकन टोबॅको आयटीसी हॉटेलमध्ये 17.4 टक्के वाटा विक्रीच्या तयारीत आहे. या निर्णयाने आयटीसी नाराज झाली आहे. जर BATने या डिमर्जरमधून अंग काढले तर हॉटेल व्यवसायातील स्टेक, हिस्सेदारी न खरेदी करण्याचा निर्णय आयटीसीने घेतला आहे. त्यामुळे बॅट आता पेचात अडकली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.