Rule of 72: PPF, SSY, KVP, NSC किंवा Mutual Funds मध्ये असा करा पैसा दुप्पट

कुठल्याही गुंतवणुकीमध्ये तुमचा पैसा दुप्पट होणं हे तुम्ही किती काळापर्यंत गुंतवणूक करत असता यावर अवलंबून आहे. कारण, त्यानुसार तुम्हाला व्याज किंवा रिर्टन मिळतं.

Rule of 72: PPF, SSY, KVP, NSC किंवा Mutual Funds मध्ये असा करा पैसा दुप्पट

नवी दिल्ली : देशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे. अशात गुंतवणूक म्हटली की कमी वेळात जास्त पैशांचा नफा व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. कुठल्याही गुंतवणुकीमध्ये तुमचा पैसा दुप्पट होणं हे तुम्ही किती काळापर्यंत गुंतवणूक करत असता यावर अवलंबून आहे. कारण, त्यानुसार तुम्हाला व्याज किंवा रिर्टन मिळतं. रिटर्न किंवा व्याज जितकं जास्त वाढणार तितक्या लवकर तुमचे पैसे डबल होणार. (rule of 72 know how to double money on investments of PPF SSY KVP NSC Mutual Funds)

यामुळे, तुम्ही आतापर्यंत केलेली गुंतवणूक किती दिवसांसाठी आहे आणि त्याचा किती फायदा होणार आहे, याबद्दल माहिती असणं महत्त्वाचं आहे. यासाठी एक सोपा उपाय म्हणजे ‘रूल ऑफ 72’ (Rule of 72).

72 व्या नियमानुसार, एक सरळ फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याअंतर्गत तुम्ही गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाला 72 भागा. यातून नेमक्या किती दिवसांनी तुमचा पैसा डबल होईल याचा तुम्हाला अंदाज येईल. समजा तुम्ही बँकेत वार्षिक वर्षाकाठी 5% व्याज जमा केलं आहे. यात तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 14 वर्षांचा कालावधी लागेल. आता हे 14 वर्ष कसं आले तर यासाठी ‘रूल ऑफ 72’ चा वापर करण्यात आला आहे.

रूल ऑफ 72 =72/5 = 14.4 वर्ष

जर तुम्हाला पैसा आणखी डबल करायचा असेल तर त्यासाठी किंती गुंतवणूक करावी? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण यासाठीदेखील रूल ऑफ 72 हा फॉर्म्युला महत्त्वाचा ठरणार आहे. (rule of 72 know how to double money on investments of PPF SSY KVP NSC Mutual Funds)

>> PPF, सुकन्या समृद्धि योजना (SSY), किसान विकास पत्र (KVP), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि म्युच्युअल फंडांमध्ये हा रूल कसा वापरावा? तर याची गणना करण्यासाठी सध्याचा व्याज दर घेतला आहे.

>> PPF वर वर्षाला 7.1 टक्के व्याजदर मिळत आहे. अशात PPF मध्ये गुंतवणूक केल्यानंतर पैसे डबल होण्यासाठी किमान 10 वर्ष (72/7.1 =10.14) लागतील.

>> सुकन्या समृध्दी योजनेत पैसा दुप्पट होण्यासाठी 9.4 वर्षे लागतील. या योजनेअंतर्गत 7.6 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

>> किसान विकास पत्रवर सध्या 6.9 टक्के दराने व्याज मिळत आहे. याचा हिशोब केला असता योजनेत पैसे लावल्यानंतर 10.4 वर्षात डबल होईल.

>> राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)वर 6.8 टक्क्यांनी व्याज मिळत आहे. ज्यामध्ये 1.5 वर्षांनी पैसा डबल होईल.

>> सध्या अल्पावधी म्युच्युअल फंड आणि डायनॅमिक बाँडला सुमारे .8.5 टक्के दराने परतावा मिळतो. जर आपण अशाच परताव्याचा विचार केला तर मग त्यात गुंतवणूक केल्यानंतर आपले पैसे सुमारे 8.4 वर्षांत दुप्पट होतील.

संबंधित बातम्या – 

आर्थिक अडचण असेल तर काळजी सोडा, सोप्या पद्धतीनं काढा PF अकाऊंटमधून अ‍ॅडव्हान्स पैसे

…म्हणून आताच करा सोनं खरेदी, दिवाळीपर्यंत बसेल खिशाला कात्री

(rule of 72 know how to double money on investments of PPF SSY KVP NSC Mutual Funds)

Published On - 10:22 am, Tue, 6 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI