AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupees Downfall: सांगा भाऊ, या रुपयाचं करायचं काय? डॉलरसमोर खाली डोकं वर पाय!

Rupees Fell New Record : संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सातत्याने रोख रक्कम काढून घेतल्याने आणि बाह्य कर्ज परतफेडीमुळे रुपया निचांकी पातळीवर घसरला. रुपयाचं भविष्य काय असं सध्या कोणीही विचारु नये अशी परिस्थिती आहे.

Rupees Downfall: सांगा भाऊ, या रुपयाचं करायचं काय? डॉलरसमोर खाली डोकं वर पाय!
डॉलरपुढे रुपयाची घसरगुंडीImage Credit source: TV9marathi
| Updated on: Jul 06, 2022 | 12:25 PM
Share

तर जागतिक भूराजकीय(Geopolitical) आणि आर्थिक (Economic) घडामोडींमध्ये टिकून राहण्याची कसरत करणा-या रुपयाची पार बोबडी वळाली आहे राजेहो. गेल्या आठवड्यात निचांकी (downfall)पातळीवर घसरल्यावर रुपयाने (Rupee) पुन्हा एकदा आपटी खाली आहे. आता तुम्ही म्हणाल रुपया घसरला तर आपल्याला त्याचं काय? तर राजे हो याचा परिणाम थेट तुमच्या खिश्यावर होईल. इंधनाचा(Fuel Price) भडका उडेल. खाद्यतेल(Edible Oil) वाढेल. सोन्याच्या (Gold) किंमती भडकतील. म्हणजे जेवढ्या काही वस्तू आपण आयात करतो त्याच्या किंमती भडकतील आणि पर्यायाने महागाई वाढेल. त्यामुळे रुपयाची ही घसरगुंडी थांबली नाही तर महागाई आपल्या मुळावर येऊन बसेल एवढं मात्र नक्की. रुपया गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घरंगळत आहे. रुपयावर अमेरिकन डॉलरचा (Dollar)दबाव कायम असल्याने मंगळवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 79.38 या नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला.

काय आहेत कारणे

पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचे विक्रीसत्र

पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी अखंडपणे विक्रीसत्र कायम ठेवले आहे. शेअर बाजारात संस्थात्मक गुंतवणूकदार सातत्याने विक्री करत आहे. एप्रिल महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 12,039.43 कोटी, 6,015.34 कोटी रुपये मे महिन्यात तर 25.89 कोटी रुपये जून महिन्यात काढून घेतले आहे. त्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात ही घसरणीचे सत्र सूरु असून बाजारातील आत्मविश्वासासोबतच परकीय गुंतवणूकदारांचा अविश्वासही प्रकर्षाने दिसून येत आहे.

कर्ज परतफेडीचा दबाव

भारताच्या व्यापारात तूट आली आहे.भारताने जूनमध्ये 25.6 अब्ज डॉलरची विक्रमी व्यापार तूट नोंदवली आहे. कोरोनानंतर आता कुठं भारतीय अर्थव्यवस्था सावरायला लागली आहे. त्यातच या वर्षी आणि पुढील वर्षभरात विक्रमी बाह्य कर्ज परतफेड करायची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, देशावर असलेले जागतिक 40% पेक्षा जास्त कर्ज ( $621 अब्ज) पुढील नऊ महिन्यांत परतफेड करायचं आहे. ही परतफेड भारताच्या परकीय चलनाच्या साठ्याच्या 44% च्या समतुल्य आहे. ही परतफेड करताना भारतीय रुपयावर दबाव येईल आणि रुपया पुन्हा कमकूवत होईल.

गंगाजळीत दिवसागणिक घट

फेब्रुवारीपासून, RBI ने पोर्टफोलिओ टिकवून ठेवण्यासाठी 41 अब्ज डॉलरची विक्री केली आहे. सध्या चलनसाठा पुरेसा आहे. 3 सप्टेंबर 2021 रोजी भारताकडे 642.5 अब्ज डॉलर्सचा परकीय साठा होता. तो या 24 जूनपर्यंत गंगाजळी 593.3 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली घसरला. NSDL च्या आकडेवारीनुसार, या वर्षी 4 जुलैपर्यंत विदेशी निधीद्वारे 30.67 अब्ज डॉलरची भारतीय वित्तीय मालमत्ता विकली गेली.

या क्षेत्रावरही होणार परिणाम

ज्या ठिकाणी डॉलर चलनाशी थेट संबंध येतो. त्या प्रत्येक क्षेत्रावर या घडामोडीचा दुरगामी परिणाम दिसून येईल. ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक पार्ट्स हे परदेशातून आयात होतो. तर लॅपटॉप, टीव्ही आणि इतर होम अपलायन्ससाठी ही काही पार्ट्स परदेशातून आयात करण्यात येतात. मोबाईलचे काही पार्टस् ही बाहेरुन येतात. हा व्यवहार डॉलरशी संबंधित असल्याने त्यांच्या किंमती वाढणार आहे. परदेशातील शिक्षण ही यामुळे वाढेल. त्यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी आता विद्यार्थ्यांना अधिक रक्कम उभी करावी लागणार आहे. ज्वैलरी आणि डायमंड उद्योगावरही याचा परिणाम पहायला मिळू शकतो.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.