SBI अलर्ट! आपला संपूर्ण डेटा चोरीला जातोय, मग चुकूनही हे मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका

या पोस्टमध्ये लोकांना बनावट मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आलाय. यासह बँकेने काही सेफ्टी टिप्स पाळण्याचा सल्लाही दिलाय.

SBI अलर्ट! आपला संपूर्ण डेटा चोरीला जातोय, मग चुकूनही हे मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका
एसबीआयच्या पेन्शन सेवेमुळे त्रस्त आहात? मग या नंबरवर करा मॅसेज, काही मिनिटांत तक्रार होईल दूर
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 7:37 PM

नवी दिल्लीः SBI Online, Net Banking Alert: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा ग्राहकांना सावध केलेय. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये लोकांना बनावट मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आलाय. यासह बँकेने काही सेफ्टी टिप्स पाळण्याचा सल्लाही दिलाय. (SBI Alert! Your Entire Data Is Stolen, So Don’t Accidentally Download These Mobile Apps)

आपली सुरक्षा ही आमची प्राथमिकता

एसबीआयने (SBI) ट्विट केले आहे की, अशा ठिकाणी संपूर्णपणे सत्यापित नसलेले अ‍ॅप डाऊनलोड करू नका. “आपली सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे! येथे काही सुरक्षा टिप्स आहेत, ज्या आपल्याला वैयक्तिक आणि आर्थिक डेटा चोरीपासून वाचवू शकतात. आजकाल वाढत्या फसवणुकीचा विचार करता बँकेने आपल्या ग्राहकांना अधिक सावधगिरीचा सल्ला दिलाय.”

बनावट अ‍ॅप्स टाळण्यासाठी बँकेने दिला सल्ला

कोरोना साथीच्या काळात फसवणुकीचे प्रकार सतत वाढत आहेत. अशा परिस्थितीत बनावट अ‍ॅप्सच्या माध्यमातून लोक सहज फसत आहेत. अशा परिस्थितीत बरेच लोक ठगांच्या जाळ्यात अडकलेत. यामुळे बँकेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. हेच कारण आहे की, एसबीआय वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी सतर्क सूचना जारी करते. बनावट अ‍ॅप्स व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या ईमेल, एसएमएस, कॉल किंवा एम्बेड केलेल्या लिंकपासून लोकांनी स्वत: ला दूर ठेवावे, असा सल्ला बँकेने दिलाय.

ग्राहकांना आमिषानं फसवणुकीचे बळी केले जातेय

गेल्या आठवड्यात एका सायबर सुरक्षा संशोधकाने असा इशारा दिला होता की, फिशिंग घोटाळ्यांतर्गत चिनी मूळचे हॅकर्स एसबीआय वापरकर्त्यांना लक्ष्य करीत आहेत. तो वेबसाईटची लिंक वापरून ग्राहकांना त्यांचे केवायसी अद्ययावत करण्यास सांगत आहेत. यानंतर व्हॉट्सअ‍ॅप मेसेजच्या माध्यमातून ते 50 लाखांचे बक्षिसे जिंकण्याचे आमिष देत आहेत. आयएएनएसच्या अहवालानुसार, अशी दोन प्रकरणे समोर आली आहेत. या फसवणुकीशी संबंधित सर्व डोमेन चीनमधील नोंदी दाखवत होती.

संबंधित बातम्या

आता घर बसल्या करा कोरोना चाचणी, अवघ्या 325 रुपयांत कोरोना किट लाँच

Gold Latest Price : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त, पटापट तपासा नवे दर

SBI Alert! Your Entire Data Is Stolen, So Don’t Accidentally Download These Mobile Apps

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.