SBI ग्राहकांना फटका, FD वरील व्याज दरात कपात

देशाची सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने 42 कोटी खातेधारकांना धक्का दिला आहे. बँकेने त्यांच्या मुदत ठेवीवरील व्याज दरात कपात केली आहे.

SBI ग्राहकांना फटका, FD वरील व्याज दरात कपात
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फिक्स डिपॉझिट ठेवलेलं असेल तर 1 ऑगस्टपासून त्याचा मोबदला कमी मिळेल. एसबीआयने 179 दिवसांच्या जमा ठेवीवर व्याज दरात 0.5 ते 0.75 टक्क्यांनी कपात केली आहे. तर दीर्घ कालावधीच्या जमा ठेवीसाठी 0.20 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय बँकेने घेतलाय.
Nupur Chilkulwar

|

Jan 14, 2020 | 7:32 PM

नवी दिल्ली : देशाची सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने 42 कोटी खातेधारकांना धक्का दिला आहे. बँकेने त्यांच्या मुदत ठेवीवरील व्याज दरात कपात केली आहे. म्हणजे जर तुमचं SBI मध्ये फिक्स्ड डिपॉझिट असेल (SBI cuts the interest rates on Fixed deposit), तर त्यावर तुम्हाला आधीच्या तुलनेत आता कमी व्याज मिळणार आहे. यामुळे ग्राहकांच्या ठेवीवर मोठा परिणाम होणार आहे. लाईव्ह मिंटच्या बातमीनुसार, SBI ने त्यांच्या मुदत ठेवीवरील व्याज दरात 15 बेसिक पॉईंटची कपात केली आहे. SBI च्या या नव्या व्याज दरांमुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे (SBI cuts the interest rates on Fixed deposit).

SBI ने जारी केलेली नवीन व्याज दरं 10 जानेवारीपासून लागू झाली आहेत. बँकेने ज्या मुदत ठेवीचा कालावधी 1 वर्ष ते 10 वर्ष असेल, अशा एफडीवर 15 बीपीएसची कपात केली आहे. तर 7 दिवसांपासून ते 1 वर्षांपर्यंतचा कालावधी असलेल्या एफडीच्या व्याज दरांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

7 ते 45 दिवसांच्या FD चे नवे व्याज दर 4.5 टक्के आहेत.

46 ते 179 दिवसांच्या FD चे नवे व्याज दर 5.50 टक्के आहेत.

180 ते 210 दिवस , 211 ते 1 वर्षांपर्यंतच्या दिवसांच्या FD चे नवे व्याज दरांमध्ये 0.20 टक्क्यांची कपात केली आहे. आता यावर 5.80 टक्क्यांनी व्याज मिळणार आहे.

1 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या FD वरील व्याज दर

1 ते 2 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.10 टक्के व्याज मिळेल.

2 ते 3 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.10 टक्के व्याज मिळेल.

3 ते 5 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.10 व्याज मिळेल.

5 ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वरही 6.10 टक्के व्याज मिळेल.

ज्येष्ठ नागरिकांसाठी नवे व्याज दर

SBI ने ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त 50 बेसिक पॉईंट व्याज दर देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, आता 7 ते 45 दिवसांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 5 टक्के व्याज, 46 ते 179 दिवसांच्या FD वर 6 टक्के, 180 ते 210 दिवस आणि 211 ते 1 वर्षांच्या FD वर 6.30 टक्के व्याज देणार आहे. तर, 1 ते 2 वर्ष आणि 2 ते 3 वर्षांच्या FD वर 6.60, 3 ते 5 वर्षांच्या FD वर 6.60 टक्के व्याज देईल. तसेच, 5 ते 10 वर्षांच्या FD वरही ज्येष्ठ नागरिकांना 6.60 टक्के व्याज मिळणार आहे.

SBI cuts the interest rates on Fixed deposit

पाहा व्हीडिओ :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें