AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेन्सेक्स @1,00,000; बातमी तरी काय? नवीन वर्षात शेअर बाजार रेकॉर्ड मोडणार?

Sensex Cross 1 Lakh Mark in New Year 2025 : सरत्या वर्षात शेअर बाजारात चढउताराचे सत्र दिसले. बाजाराने अचानक धक्के दिले असले तरी पॉझिटिव्ह रिटर्न दिला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग 9 व्या वर्षी सकारात्मक परिणाम दिसून आला. सेन्सेक्स 1 लाखांचा टप्पा ओलांडेल का?

सेन्सेक्स @1,00,000; बातमी तरी काय? नवीन वर्षात शेअर बाजार रेकॉर्ड मोडणार?
सेन्सेक्स यंदा नवीन पल्ला गाठणार?
| Updated on: Jan 02, 2025 | 11:17 AM
Share

सरत्या वर्षाने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना झटका दिला असला तरी फायदा पण करुन दिला. सेन्सेक्स, निफ्टी रिटर्न देण्यात यशस्वी ठरला. या दोन्ही निर्देशांकांनी सरत्या वर्षात जवळपास 9 टक्के परतावा दिला. बाजाराने अचानक धक्के दिले असले तरी पॉझिटिव्ह रिटर्न दिला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग 9 व्या वर्षी सकारात्मक परिणाम दिसून आला. सेन्सेक्स या वर्षात 2025 मध्ये 1 लाखांचा टप्पा ओलांडणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर काही तज्ज्ञ या वर्षात पण गुंतवणूकदारांना झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

9 व्या वर्षी Sensex-Nifty ची भरारी

सरत्या वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण दिसली. तर याच वर्षात शेअर बाजाराने नवीन विक्रमाला गवसणी सुद्धा घातली. ANI वृत्तसंस्थेने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या एका अहवाला आधारे वृत्त दिले आहे. त्यानुसार, बाजारात कोसळधार असली तरी त्याने उच्चांकाला गवसणी सुद्धा घातली आहे. हे सलग 9 वे वर्ष आहे जेव्हा Sensex-Nifty ने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. निफ्टी-50 ने 50 शेअर असणाऱ्या निफ्टी-50 इंडेक्समध्ये यंदा 9.21 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. तर दुसरीकडे BSE च्या 30 शेअरच्या सेन्सेक्स निर्देशांकाने 8.62 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

बाजाराची दिशा कोणती?

Business Standard मधील वृत्तानुसार, चार्ट पॅटर्नच्या संकेतानुसार, 2025 मध्ये निफ्टी जवळपास 8 टक्क्यांपर्यंत वधारला. तर याच काळात शेअर बाजार 15.2 टक्क्यांनी घसरला. 200 दिवसांमध्ये मुव्हिंग एव्हेरज डाटानुसार, निफ्टीला फार मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

या वृत्तानुसार, निफ्टीची कामगिरी यंदा, 2025 मध्ये चांगली झाली नाही तर निफ्टी 20,200 पर्यंत येण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2023 मध्ये ही स्थिती होती. पण जर बाजाराने घौडदौड केली तर 25,700 अंकापर्यंत निफ्टी झेप घेण्याची शक्यता आहे.

सेन्सेक्स 1 लाख अंकांचा टप्पा ओलंडणार?

30 अंकांचा सेन्सेक्स निर्देशांक सरत्या कॅलेंडर वर्षात जवळपास 9 टक्के चढला. अर्थात सेन्सेक्स त्याच्या उच्चांकी झेप 85,978 अंकाच्या तुलनेत 8 टक्के घसरला आहे. चार्ट संकेतानुसार, 69,000 ते 88,600 दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जर सेन्सेक्समध्ये मोठी उलथापालथ झाली, सेन्सेक्स घसरला तर तो 62,700 अंकांपर्यंत खाली कोसळण्याची भीती आहे. जर सेन्सेक्सने घौडदौड सुरूच ठेवली तर तो 94,700 अंकांवर पोहचण्याची शक्यता आहे. त्यातही भारतीय अर्थव्यवस्थेने जोमदार कामगिरी केल्यास, काही बडे निर्णय झाल्यास, महागाई कमी झाल्यास सेन्सेक्स 1 लाख अंकांची कमाई करण्याची शक्यता आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.