AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stock Market Crash : शेअर बाजार लंबालाट, गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटी बुडाले

Akshaya Tritiya 2024 चा मुहूर्त गाठण्याअगोदरच शेअर बाजाराने गुंतवणूकदारांची पिसं काढली. बाजार गडगडल्याने अनेकांचे कमाईचे स्वप्न भंगले. 25 शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा झटका दिला. एकाच फटक्यात गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटी बुडाले.

Stock Market Crash : शेअर बाजार लंबालाट, गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटी बुडाले
बाजार गडगडला
| Updated on: May 09, 2024 | 5:20 PM
Share

शेअर बाजार गडगडल्याने आज हाहाकार माजला. निफ्टी 345 अंकांनी पडला तर सेन्सेक्स 1062 अंकांनी लंबालाट झाला. निफ्टी 22,000 अंकांवर तर सेन्सेक्स 72,404 अंकांवर बंद झाला. या आठवड्यातील ही सर्वात मोठी घसरण मानण्यात येते. गेल्या पाच व्यापारी सत्रात सेन्सेक्स 75,000 हून 72 हजारांपर्यंत घसरला आहे. तर निफ्टी 22,750 अंकांहून घरंगळत 21,957 अंकांवर पोहचला.

गुरुवारी 9 मे 2024 रोजी बीएसई सूचीबद्ध टॉप 30 शेअर्समधील 25 शेअरमध्ये मोठी घसरण दिसली. केवळ 5 शेअर्सने या वादळातही भरारी घेतली. टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये जवळपास 2 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा शेअरमध्ये 1.48 टक्के, एसबीआय शेअरमध्ये 1.27 टक्के, इन्फोसिस, HCL मध्ये किंचित तेजी दिसली. तर सर्वाधिक आपटी बार झालेल्या शेअरमध्ये एलअँडटी स्टॉकमध्ये 5.56 टक्के घसरण दिसली. त्यानंतर एशियन पेंट्स, JSW Steel, ITC, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांपर्यंत घसरण दिसली.

शेअर बाजार घसरणीचे कारण काय

सुरुवातीच्या व्यापारी सत्रात शेअर बाजारात घसरण होती. पण नंतर जास्त नफ्याच्या चक्करमध्ये विक्री सत्र सुरु झाले आणि शेअर बाजार सपाट झाला. त्याची घसरण कायम राहिली. बुधवारी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 6669.10 कोटी रुपये काढून घेतले. त्याचा परिणाम गुरुवारच्या व्यापारी सत्रात दिसून आला. पाच व्यापारी सत्रात FII ने एकूण 15,863 कोटी रुपये इक्विटी विक्री केली. याशिवाय काही कंपन्यांची कामगिरी अत्यंत खराब होती, त्याचा परिणाम दिसून आला.

या 6 शेअरमध्ये जास्त घसरण

L&T शेअरमध्ये सर्वाधिक 6 टक्के घसरण दिसून आली. याशिवाय पॉवर फायनान्समध्ये 5 टक्के, BPCL Stock मद्ये जवळपास 5 टक्के, पिरामल एंटरप्राईजेजमध्ये जवळपास 9 टक्के, NHPC शेअरमध्ये 5.26 टक्के आणि मणप्पुरम फायनान्स शेअरमध्ये 8 टक्क्यांची घसरण दिसून आली. आजच्या पडझडीमुळे शेअर बाजारात गुंतवणूदारांना 7.3 लाख कोटींचा फटका बसला. गुरुवारी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 7.3 लाख कोटींची घट आली. मार्केट कॅप 400 कोटींच्या घरात होते. ते आता 393.73 लाख कोटींवर घसरले. अक्षय तृतीया तोंडावर असतानाच शेअर बाजारातील ही गडबड अनेकांची स्वप्न भंग करणारी ठरली.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.