Tata Adani : टाटा-अदानी समूहाचे या कंपनीवर लक्ष, हिस्सेदारीसाठी रस्सीखेच, कंपनीचा शेअर आताच सूसाट

Tata Adani : या कंपनीचा शेअर बाजारात धुमाकूळ घालत आहे. गुंतवणूकदारांचे या शेअरवर बारीक लक्ष आहे.

Tata Adani : टाटा-अदानी समूहाचे या कंपनीवर लक्ष, हिस्सेदारीसाठी रस्सीखेच, कंपनीचा शेअर आताच सूसाट
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 9:20 AM

नवी दिल्ली : पॉवर ट्रेडिंग कंपनी पीटीसी इंडियाचा (PTC India) शेअर सध्या बाजारात (Share Market) धुमाकूळ घालत आहे. या शेअरमध्ये धडाधडा अप्पर सर्किट (Upper Circuit) लागत असल्याने गुंतवणूकदारांचे या शेअरकडे लक्ष आहे. 19 जानेवारी 2023 रोजी या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. काल हा शेअर 105.70 रुपयांवर बंद झाला. यापूर्वी मंगळवारी आणि बुधवारी पीटीसी इंडियाच्या शेअरमध्ये 5-5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. शेअर बाजाराबाहेर या कंपनीबाबतच्या अनेक घडामोडी घडत आहे. त्याचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मीडिया रिपोर्टसनुसार, भारत आणि आशियातील सर्वात मोठे श्रीमंत गौतम अदानी (Gautam Adani) आणि टाटा पॉवर (Tata Power) यामध्ये हिस्सेदारी घेण्यासाठी आग्रही आहे. अदानी समूह (Adani Group) या कंपनीतील वाटा खरेदीसाठी आग्रही आहे. त्यासाठी कंपनीने योजना आखल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अदानी जगातील टॉप5 मधील श्रीमंत व्यक्ती आहे. ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 119 अरब डॉलर आहे. पीटीसी इंडियाच्या प्रमोटर कंपन्यांमध्ये पीटीसी लिमिटेड, एनएचपीसी लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्या त्यांची चार टक्के हिस्सेदारी विक्री करण्याच्या तयारीत आहेत.

हे सुद्धा वाचा

पीटीसी इंडियाचा शेअरने या वर्षात सर्वाधिक वेळा उसळी घेतली आहे. आतापर्यंत या शेअरने 30 टक्क्यांपेक्षा अधिक वेळा उसळी घेतली आहे. हा शेअर सध्या रॉकेटसिंग ठरला आहे. हा शेअर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग अॅव्हरेजपेक्षा अधिक ट्रेड करत आहे.

गेल्यावर्षी पीटीसी इंडियाच्या शेअरमध्ये 11.12% टक्क्यांची घसरण दिसून आली. यंदा मात्र यामध्ये 18.8% टक्क्यांची वृद्धी आली आहे. या कंपनीचे बाजारातील भांडवल 2,852.04 कोटी रुपये आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 32.26 टक्क्यांहून घसरला.

आता या कंपनीचा एकूण नफा 119.79 रुपये राहिला आहे. गेल्या वर्षी या कंपनीचा नफा गेल्या समान तिमाहीत 177.11 कोटी रुपये होता. पीटीसी इंडियाचा शेअर गुरुवारी अप्पर सर्किटसह 105.70 रुपयांवर उघडला होता. त्यानंतर त्यात सातत्याने तेजीचे सत्र दिसून आले. गेल्या सहा महिन्यात या शेअरमध्ये 20 टक्क्यांपेक्षा अधिकची तेजी दिसून आली.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.