AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : नेमकं हेच गणित फिसकटतं, मग होतो मोठा लॉस, शेअर विक्रीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

Share Market Time to Sell: अनेकदा शेअर बाजारातील दिग्गजांची सुद्धा एक्झिट घेताना गडबड होते आणि काही सेकंद उशीरा एंट्री झाल्यावर हाती नुकसान येते. नेमकं हेच गणित फिसकटतं आणि लॉस पदरात पडतो. मग शेअर विक्रीची योग्य वेळ कोणती?

Share Market : नेमकं हेच गणित फिसकटतं, मग होतो मोठा लॉस, शेअर विक्रीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
शेअर बाजार
| Updated on: Nov 13, 2025 | 3:58 PM
Share

Stock Market Profit Booking : अनेकदा शेअर बाजारात खरेदीची वेळ साधली तरी विक्रीची संधी हुकली की हात चोळत बसावे लागते. शेअरची स्वस्तात खरेदी जितकी महत्त्वाची आहे. तितकेच प्रॉफिट बुकींगही महत्त्वाचे आहे. त्यामुळे योग्य वेळी शेअर विक्री करण्याचे कौशल्य असणे हे वरदान मानल्या जाते. बहुतेक वेळा अनेक गुंतवणूकदार नेमका शेअर विक्रीतच घोळ घालतात आणि मग त्यांचा लॉस होतो. बाजारात चढउताराचे सत्र सुरुच असते. काही जण एखादी बातमी धडकली की मागचा पुढचा विचार न करता शेअर विक्री करतात. तर काही जण मोठ्या आमिषाने शेअर धरून ठेवतात आणि सर्व नफा गमावतात. शेअर खरेदीपूर्वी त्याच्या विक्रीची योजना आखा, हे वॉरेन बफेट (Warren Buffett) यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. मग शेअर विक्रीची योग्य वेळ कोणती?

यावर्षात अनेकदा शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना मोठा झटका दिला. तरीही निफ्टी (Nifty) 26,000 अंकांच्या जवळपास ट्रेड करत आहे. सध्या संरक्षण क्षेत्रापासून ते ईव्हीपर्यंत अनेक क्षेत्रात तेजीचे वातावरण आहे. या सेक्टरमध्ये स्मार्ट गुंतवणूकदार योग्य वेळी एक्झिट घेतो आणि नफा मिळवतो. शेअर बाजारात जर तुम्हाला त्या स्टॉकमधून वेळीच बाहेर पडण्याचे कसब मिळाले तर तुम्ही मार्केट बूल ठराल.

1. लक्ष्य पूर्ण झाले की बाहेर पडा

एखाद्या शेअरमध्ये तुम्ही इतक्या टप्प्यापर्यंत शेअर गेला. त्याने इतकी झेप घेतली की बाहेर पडेल असे ठरवले तर त्यावर अढळ राहा. मग शेअर पुन्हा वर जावो अथवा खाली येवो. त्यापूर्वी नफा कमवून तुम्ही बाहेर पडा. उदाहरणार्थ, टाटा मोटर्स (Tata Motors) 950 रुपयांवरून ₹1,200 पर्यंत पोहोचला तर विक्रीची वेळ चुकवू नका.

2. कंपनीचे फंडामेंटल्स कमी झाल्यास

एखाद्या कंपनीचा नफा सतत घटत असेल. कंपनी कर्जबाजारी होत असेल अथवा व्यवस्थापनाविषयी तुमचा विश्वास डळमळीत होत असेल तर अशा कंपन्यांमधून बाहेर पडणे कधीही फायद्याचेच आहे.

3. शेअर खूप महागल्यास

जेव्हा एखाद्या शेअरचा P/E गुणोत्तर 50x पेक्षा जास्त झाला असेल तर याचा अर्थ धोका वाढत आहे. किंमतीचा फुगवटा हेरा आणि बाहेर पडा. तरच तुमचे नुकसान टाळता येईल.

4. पोर्टफोलिओचा विचार करा

जेव्हा एखाद्या शेअरचा पोर्टफोलिओत मोठा वाटा झाला असेल. एखादा शेअर एकूण पोर्टफोलिओच्या 25-30% झाला असेल, तर त्याचा काही भाग विकून पोर्टफोलिओ डाइवर्सिफाय करणे फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

5. पैशांची निकड असेल तर विक्री करा

अनेकदा घर, शिक्षण आणि एखाद्या वैयक्तिक अडचण आली तेव्हा सारासार विचार करून आणि भविष्यातील गुंतवणूक पाहता शेअरमधील काही भाग विक्री करू शकता.

6. बाजाराकडे दुर्लक्ष नको

जेव्हा मार्केट खाली येऊ लागले की अथवा बीअर फेज सुरू झाला अथवा Nifty 15-20% पर्यंत घसरले तर अशा वेळी डगमगलेले शेअर काढण्यात शहाणपण मानल्या जाते.

7. नवीन संधीसाठी शेअरची पदरमोड

जेव्हा नवीन चांगला स्टॉक हेराल. तो मोठी झेप घेण्याची शक्यता लक्षात घेत एखादा जुना स्टॉक विक्री करून तुम्ही त्या नवीन शेअरवर दावा लावू शकता. अर्थात यासाठी तुमचा अभ्यास आणि बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.

8. तांत्रिक संकेतांचे पण ऐका

अनेकदा तांत्रिक संकेत शेअर विक्री करण्यास सांगतात. जेव्हा RSI 70 किंवा त्याहून अधिक असेल, शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकापासून घसरला असेल. अथवा कंपनीचे काही निर्णय पचनी पडले नसेल तर शेअर विक्री करून मोकळे होऊ शकता.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.