AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market Tips | जुगार कसाला, असा पैसा कमवा, शेअर बाजारात गिरवा हा ‘मंत्र’

Share Market Tips | शेअर बाजार हा भूल भुलैया आहे, ही गुंतवणूक म्हणजे जुगार अशा अनेक कल्पना आहे. बाजारात हौसे-नवसे-गवसे हे तीन प्रकारचे लोक येतात. पण काहींना त्यात कुठे आणि कशी गुंतवणूक करावी, कसा पैसा मिळवावा हे कळत नाही. तुमचा अभ्यास, तज्ज्ञांचे मत महत्वाचे आहे.

Share Market Tips | जुगार कसाला, असा पैसा कमवा, शेअर बाजारात गिरवा हा 'मंत्र'
| Updated on: Oct 24, 2023 | 5:11 PM
Share

नवी दिल्ली | 24 ऑक्टोबर 2023 : पैसे कमविणे कोणाला नको आहे. शेअर बाजारात खूप पैसा असल्याचे बोलले जाते. हा अथांग महासागर असून ज्याला जमले तो तसा पैसा कमावतो, असे बोलल्या जाते. काहींनी तर शेअर बाजारात अवघ्या 5000 रुपयांपासून सुरुवात केली आहे. शेअर बाजारात अब्जावधींची उलाढाल होते. काही गुंतवणूकदार तर बाजारातून कोट्यवधींची कमाई करत आहे. त्यांना पाहून अनेकांना हेवा वाटतो, बाजारातून ही मंडळी कशी कमाई करतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. खरंतर काही बाबी लक्षात ठेवल्या तर तुम्हालाही लखपती, करोडपती होता येते. पण अनेकदा गुंतवणूकदार झटपट पैसा कमाविण्याच्या स्पर्धेत जोखीम विसरतात आणि त्यांना फटका बसतो. पण या गोष्टी लक्षात ठेवल्यास कमाई करता येऊ शकते.

  1. सुरुवात कराल कशी – शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारात कसे काम करतात, कशी कमाई होते, याची नीट माहिती घ्या. डिजिटल युगात तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ही माहिती मिळवू शकता. त्यासाठी अर्थतज्ज्ञाची मदत पण घेऊ शकता.
  2. छोट्या रक्कमेतून करा सुरुवात – शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी मोठ्या रक्कमेची गरज नाही. अनेक लोक हीच चूक करतात. काही जण तर कर्ज काढण्याची घोडचूक करतात. छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही सुरुवात केल्यास बाजारातील चढउताराचा अंदाज येतो. एकदा अनुभव गाठीशी आला की मोठी रक्कम गुंतवा.
  3. मोठ्या आमिषाला बळी पडू नका – पहिल्याच दिवशी एक लाख रुपये रिटर्न मिळाला पाहिजे, या मानसिकतेतून बाहेर पडा. रिटर्नचा चक्कर सोडून चांगल्या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करा. गुंतवणुकीची सुरुवात लार्ज कॅप कंपन्यांच्या माध्यमातून करा. काही वर्षांचा अनुभव आला की जोखीम उचला.
  4. गुंतवणूक करत रहा- एकदाच गुंतवणूक करुन बाजूला होऊ नका. दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवणूक करा. त्यासाठी चांगल्या स्टॉकची माहिती काढा, त्यांची कामगिरी पहा. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या गुंतवणूकीतून चांगला फायदा होतो.
  5. पेनी स्टॉकपासून चार हात लांब- पेनी स्टॉक हे सर्वात जोखमीचे मानण्यात येतात. 10-15 रुपयांचे स्टॉक्स आपल्याला भूरळ पाडतात. पण त्यांची खरेदी ही कधीकधी फसवी ठरते. हे पैसा जमवून गाशा गुंडाळतात. तर काही पेनी स्टॉक लांबचा पल्ला पण गाठतात. त्यासाठी गुंतवणूक तज्ज्ञा सल्ला आवश्य घ्या. ज्या कंपन्या व्यवसायात घौडदौड करतात, त्यांचाच पेनी स्टॉक मल्टिबॅगर ठरतो.
  6. घसरणीला घाबरु नका – शेअर बाजारात घसरणीचे सत्र असले की, गुंतवणूक वाढविण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पण अनेक नवीन गुंतवणूकदार बिचकतात अथवा शेअर्सची विक्री करतात. तर मोठे गुंतवणूकदार बाजार घसरण्याची वाट पाहतात.

  • कमाईतील काही वाटा बाजूला ठेवा – शेअर बाजारातील कमाईचा काही वाटा बाजूला काढून ठेवा. नफा चांगला झाल्यास, त्यातील रक्कम बाजूला ठेवा. तर काही रक्कम गुंतवणुकीसाठी वापरा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.