Payment : UPI साठी ना इंटरनेटची गरज ना..स्मार्टफोनची कटकट, तरीही पेमेंट होणार झटपट

Payment : सुट्या पैशांमुळे व्यवहार पूर्ण करता येत नसेल तर त्यावर एक झक्कास उपाय आहे. विना इंटरनेट तुम्ही रक्कम अदा करु शकता..

Payment : UPI साठी ना इंटरनेटची गरज ना..स्मार्टफोनची कटकट, तरीही पेमेंट होणार झटपट
साध्या फोनमधूनही होणार पेमेंटImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 9:35 PM

नवी दिल्ली : युपीआय पेमेंट (UPI Payment) ही काही आता स्मार्टफोनवाल्याची (Smartphone) मक्तेदारी राहिली नाही. आता अगदी साध्या फोनवरुन तुम्हाला युपीआय पेमेंट करता येईल. त्यासाठी स्मार्टफोनची तर गरज नाहीच पण इंटरनेटचीही (Without Internet) आवश्यकता नाही.

पेटीएम, गूगल पे, फोन पे इतर युपीआय अॅपप्रमाणेच आता आता युपीआय लाईट(UPI Lite) तुमची ही चिंता मिटवणार आहे. तुम्हाला सहज कुठेही रक्कम हस्तांतरीत करता येणार आहे.

काही छोटे व्यवहार या माध्यमातून पूर्ण करता येतील. विनाइंटरनेट हा व्यवहार पूर्ण होणार आहे. त्यासाठी केवळ अॅप उघडायचं आणि पेमेंट करायचे आहे. अॅपच्या सहाय्याने कोणालाही छोट्या रक्कमेचा व्यवहार पूर्ण करता येईल.

हे सुद्धा वाचा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 20 सप्टेबर 2022 रोजी युपीआय लाईट अॅपचे उद्धघाटन केले होते. या ई-वॅलेटच्या मार्फत तुम्ही 200 रुपयांपर्यंतचा व्यवहार विना पिन, विना इंटरनेट आणि विना स्मार्टफोन द्वारे तात्काळ करु शकता.

युपीआय लाईट पेमेंटच्या माध्यमातून एका ठराविक मर्यादा असलेला व्यवहार तुम्हाला पूर्ण करता येईल. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी ग्राहकाला पिन क्रमांक टाकण्याची गरज नाही. ही रक्कम थेट समोरच्याच्या खात्यात वळती होते. तर पैसा थेट तुमच्या खात्यात जमा होईल.

युपीआय लाईट अॅपमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 2000 रुपये ठेवता येतील. तर 200 रुपयांपर्यंतची रक्कम तुम्हाला अदा करता येईल. त्यापेक्षा मोठ्या रक्कमेचा व्यवहार करता येणार नाही. याविषयीची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

सध्या देशातील 8 बँकांनी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये कॅनेरा बँक, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांच्या ग्राहकांना ही सुविधा मिळत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.