एसएमएफजी इंडिया क्रेडिटकडून लघु आणि छोट्या उद्योगांच्या आर्थिक सुबत्तेसाठी नव्या सिनेमाचे अनावरण
एसएमएफजी इंडिया क्रेडिट सहज आणि सोप्या पद्धतीने व्यवसाय कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबद्ध आहे. एसएमएफजी इंडिया क्रेडिट व्यवसाय वृद्धीला सर्वतोपरी पाठिंबा देत भारताच्या आर्थिक विकासासाठीही कंपनी आग्रही आहे.

नवी दिल्ली : एसएमएफजी या प्रसिद्ध कंपनीने नुकतेच आपल्या कार्याची महती सांगणा – या माहिती नव्या सिनेमाचे अनावरण केले. व्यवसायवृद्धीसाठी आशा, परिवर्तन तसेच अमर्यादित बाबी कितपत यशस्वी ठरतात यावर हा सिनेमा आधारलेला आहे. लघु तसेच छोटेखानी व्यवसायात गुंतलेल्या व्यावसायिकांना कर्जप्राप्तीची मदत मिळाल्यास त्यांच्या स्वप्नांना गरुडझेप मिळते, हा महत्त्वकांक्षी संदेश कंपनीने या सिनेमातून दिला आहे.
रिटेल व्यवसाय करणाऱ्या व्यावसियाकाची सिनेमात कथा मांडली आहे. हा व्यावसायिक आपला व्यवसाय मोठा करण्याची महत्त्वकांक्षा बाळगतो. लयबद्ध संगीत आणि मानवी भावभावनांच्या सुरेख मिलापातून सिनेमाची कथा उलगडते. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी व्यावसिकाला कर्ज स्वरुपात मदत करते. या आर्थिक मदतीमुळे व्यावसायिकाच्या संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी मिळते. व्यावसियाकाची उत्तरोत्तर आर्थिक प्रगती होते. तो यशस्वी व्यावसायिक होतो. मोठी स्वप्ने उराशी बाळगणा-या व्यावसायिकाचे आर्थिक सबलीकरण कसे घडते ही मनोरंजक कथा सिनेमातील प्रत्येक टप्प्यावर मांडली आहे.
या सिनेमाबद्दल एसएमएफजी इंडिया क्रेडिटचे मुख्य व्यापार अधिकारी श्री. अजय प्रतीक म्हणाले , ‘‘ लघु आणि मध्यम वर्गवारीतील उद्योगातून भारताला दर वर्षाला जवळपास ३० टक्क्यांपर्यंत सकल देशांतर्गत उत्पादन मिळते. ही वर्गवारी कमवत्या वयोगटासाठी फार महत्त्वाची आहे. या व्यावसियाकांना व्यवसाय सबलीकरणाचा विकास साधण्याबदद्ल संपूर्ण माहिती नसल्याने अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. लघु उद्योग व्यावसायिकांना एसएमएफजी इंडिया क्रेडिट बिझनेस कर्ज स्वरुपात मदत करुन त्यांचे स्वप्न साकारते हे या सिनेमाचे कथानक आहे. एसएमएफजी इंडिया क्रेडिट बिझनेसकडून व्यावसायिकांना आकर्षक व्याजदर, अल्प दस्तावेज, परताव्याच्या अनेक सोयीसुविधा उपलब्ध केल्या जातात. आमच्या प्रेक्षकापर्यंत सिनेमा पोहोचवण्यासाठी संगीतमय कवितांचा सुरेख नजराणा गुंफण्यात आला आहे. आमच्या सिनेमाचे हे खास वैशिष्ट्य असेल.’’

smfg
एसएमएफजी इंडिया क्रेडिट सहज आणि सोप्या पद्धतीने व्यवसाय कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबद्ध आहे. एसएमएफजी इंडिया क्रेडिट व्यवसाय वृद्धीला सर्वतोपरी पाठिंबा देत भारताच्या आर्थिक विकासासाठीही कंपनी आग्रही आहे. व्यवसाय वृद्धीकरण आणि परिवर्तनासाठी झटणा-या व्यावसियाकांना कर्ज उपलब्ध करुन कंपनी त्यांच्या आवडीची वित्तीय भागीदार म्हणून आपले स्थान मजबूत करते.