गावात शेतीशिवाय शानदार कमाईची संधी, या योजनेअंतर्गत मोदी सरकारकडून 3.75 लाख रुपये

तुम्हाला शेती क्षेत्रात आपला व्यवसाय सुरू करायचा असेल, मात्र शेती करायची नसेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

गावात शेतीशिवाय शानदार कमाईची संधी, या योजनेअंतर्गत मोदी सरकारकडून 3.75 लाख रुपये
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 12:24 PM

मुंबई : तुम्हाला शेती क्षेत्रात आपला व्यवसाय सुरू करायचा असेल, मात्र शेती करायची नसेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एक योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे आपण केवळ व्यवसायच सुरू करू शकत नाही तर त्यातून चांगले पैसेदेखील कमवू शकता. अशा परिस्थितीत रोजगाराच्या शोधात असलेल्या खेड्यातील लोकांना या योजनेचा मोठा फायदा घेता येईल. (Soil Health Card Scheme : You Can earn good money from this yoajana, detail information about this)

तसेच, अशा लोकांना ज्यांना काही वेगळी नोकरी करायची आहे, त्यांच्यासाठी ही योजना खूप प्रभावी ठरू शकते. अशा परिस्थितीत आपण नव्या मार्गाने रोजगार मिळवू शकता आणि लवकरच नफादेखील कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला मोदी सरकारच्या या योजनेबद्दलची माहिती देणार आहोत, तसेच याद्वारे पैसे कसे कमवायचे, तुम्हाला काय-काय करावं लागेल याबाबतची माहितीदेखील देणार आहोत.

योजना काय आहे?

केंद्र सरकारच्या या योजनेला सॉइल हेल्थ कार्ड स्कीम (Soil Health Card Scheme) असे नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून गावपातळीवर मिनी सॉइल टेस्टिंग लॅबची स्थापना केली जाईल आणि त्यानंतर या लॅबच्या माध्यमातून चांगले पैसे मिळू शकतात. देशातील शेतकरी कुटुंबांच्या तुलनेत सध्या प्रयोगशाळा फारच कमी आहेत. त्यामुळे त्यात रोजगाराची मोठी संधी आहे. तसेच देशाला अशा प्रयोगशाळांची खूप आवश्यकता आहे.

नेमकं काम काय?

यामध्ये शेतातील मातीची चाचणी केली जाते. मातीची (मृदेची) तपासणी करुन त्यात आढळणारे पोषक घटक शोधून काढले जातात आणि तपासणीनंतर त्यात सुधारणा करता येते. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पानद वाढवण्यात खूप मदत होते. मातीचे सॅम्पलिंग, चाचणी आणि सॉइल हेल्थ कार्ड देण्यासाठी सरकारकडून 300 रुपये प्रति नमुना इतके पैसे देण्यात येत आहेत. माती तपासल्यानंतर समजतं की, लागवडीच्या वेळी तुम्हाला किती खत द्यावे लागेल आणि सदर मातीत कोणते पीक घ्यायला हवे. याबरोबरच खतांविषयी बरीच माहिती मिळते.

ही लॅब कोण सुरु करु शकतं?

या योजनेद्वारे 18 ते 40 वर्षे वयोगटातील ग्रामीण तरुण ही प्रयोगशाळा उघडू शकतात. यासह उमेदवाराला अॅग्री क्लिनिक, कृषी उद्योजक प्रशिक्षण, द्वितीय श्रेणीसह विज्ञान विषयात मॅट्रिक असणे आवश्यक आहे.

किती खर्च होतो?

साधारणपणे अशी कोणतीही लॅब स्थापित करण्यासाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च येतो. परंतु, आपण या मृदा आरोग्य कार्ड योजनेचा (Soil Health Card Scheme) फायदा घेतल्यास, त्यातील 75 टक्के रक्कम तुम्हाला सरकारकडून मिळते. याचाच अर्थ सरकारकडून तुम्हाला 3.75 लाख रुपये दिले जातात. यानंतर तुम्हाला केवळ 1 लाख 25 हजार रुपये खर्च करावे लागतील. तसेच यातून तुम्ही चांगली कमाईदेखील करु शकता.

कुठे संपर्क करायचा?

लॅब सुरु करण्याची इच्छा असलेले युवक, उमेदवार, शेतकरी किंवा संस्था जिल्हा कृषी उपसंचालक, सहसंचालक किंवा त्यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवू शकतात. यासाठी तुम्ही agricoop.nic.in किंवा soilhealth.dac.gov.in या संकेतस्थळांचा वापर करु शकता. किसान कॉल सेंटर (1800-180-1551) वर संपर्क साधूनही अधिक माहिती मिळू शकते. सरकार जे पैसे देईल त्यापैकी अडीच लाख रुपये प्रयोगशाळा चालविण्यासाठी टेस्ट मशीन, रसायने व इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च केले जातात. संगणक, प्रिंटर, स्कॅनर, जीपीएस खरेदीवर एक लाख रुपये खर्च केले जातात.

इतर बातम्या

Bank of Baroda ची खास योजना, फक्त 1 रुपयामध्ये मिळणार थेट 2 लाखांचा विमा

10 हजारात घर बसल्या सुरू करा बिझनेस, सोप्या पद्धतीने महिन्याला लाखोंची कराल कमाई

Agriculture News : परदेशात भारतीय कांद्याची मागणी वाढण्याचं नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

(Soil Health Card Scheme : You Can earn good money from this yoajana, detail information about this)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.