Nvidia : कधी वेटरचे केले काम तर कधी स्वच्छ केले टॉयलेट, श्रीमंतीत आता अंबानी-अदानी यांना पिछाडीवर टाकले, कोण आहे हा अब्जाधीश

World Most Valuable Company : एनव्हिडिया ही जगातील मोठी कंपनी आहे. चिप उत्पादन आणि एआयमध्ये या कंपनीने मोठी झेप घेतली आहे. पण ही कंपनी काही एका दिवसांत जागतिक कंपनी झाली नाही. तिच्यामागे या व्यक्तीचा मोठा हात आहे.

Nvidia : कधी वेटरचे केले काम तर कधी स्वच्छ केले टॉयलेट, श्रीमंतीत आता अंबानी-अदानी यांना पिछाडीवर टाकले, कोण आहे हा अब्जाधीश
यांच्यासमोर सर्वच पिछाडीवर कमाईत
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 4:06 PM

एआय चिप तयार करणारी अमेरिकन कंपनी एनव्हिडिया (Nvidia) सध्या चर्चेत आहे. कारण या कंपनीने ॲप्पल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांना पिछाडीवर टाकले आहे. या कंपनीने जगातील सर्वात मौल्यवान कंपनीचा किताब पटकावला आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअरमध्ये 3.5 टक्क्यांची उसळी आली. कंपनीचे मार्केट कॅप 3.34 ट्रिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनात 27,86,69,56,00,000 रुपयांवर पोहचले आहे. एनव्हिडियाच्या शेअरमध्ये 174 टक्क्यांची उसळी आली आहे. तर एका वर्षांत हा शेअर 239 टक्क्यांनी चढला आहे.

कोण आहेत जेनसन हुआंग?

एनवीडियाची स्थापना जेनसन हुआंग यांनी केली होती. त्यांचा जन्म 1963 मध्ये तैवानमध्ये झाला होता. त्यांचे लहानपण तैवान आणि थायलंडमध्ये गेले. 1973 मध्ये त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना अमेरिकेतील त्यांच्या नातेवाईकांकडे त्यांना पाठवले.1984 मध्ये ओरेगॅन विद्यापीठात ते शिक्षणासाठी दाखल झाले. त्यांनी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली. स्कॉलरशिप मिळाल्यानंतर त्यांनी 1992 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदविका मिळवली. तिथे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी Nvidia ही कंपनी एप्रिल 1993 मध्ये सुरु केली. ही कंपनी व्हिडिओ गेम, ग्राफिक्स चिप्स तयार करण्याचे काम करत होती. जेव्हा कंपनी 100 डॉलरच्या घरात पोहचली. तेव्हा जेनसन यांनी त्यांच्या दंडावर कंपनीचा लोगो टॅटू करुन घेतला. त्यांची एनवीडियामध्ये 3.5 टक्के वाटा होता.

हे सुद्धा वाचा

कधी केले वेटरचे काम, तर कधी साफ केले टॉयलेट

एनव्हिडियाच्या सुरुवात होण्यापूर्वी जेनसन हुआंग हे वेटरचे काम करत होते. खर्च काढण्यासाठी त्यांना अनेक कामे करावी लागली. शिक्षणाचा खर्च पूर्ण करण्यासाठी त्यांना काही महिने Denny’s रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम करावे लागले. त्यांना कधी टॉयलेट स्वच्छ करावे लागले तर कधी दुसऱ्याचे कपडे त्यांनी धुतले. स्टँडफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसच्या मुलाखतीत त्यांनी कोणतेही काम छोटे नसल्याचे सांगितले. आर्थिक गरजा भागविण्यासाठी कधी भांडी घासली तर कधी संडास साफ केल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्यांचे कपडे धुण्याचे काम केल्याची माहिती त्यांनी दिली.

का आली तेजी?

मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या मोठ-मोठ्या कंपन्या एनवीडियाकडून जास्तीत जास्त चिप खरेदी करत आहेत. सौदी अरब आणि युएईमध्ये पण कंपनीकडून चिप खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चीनच्या कंपन्या, टेन्सेट आणि अलिबाबा पण एनवीडियाच्या दरवाजावर आहेत. जगात वाढत्या चॅटबॉट आणि एआयच्या प्रचलनाने या कंपनीकडे चिपसाठी कंपन्यांच्या रांगा लागल्या आहेत.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.