AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stock Market And Budget : बजेटचे शेअरबाजाराला कौतूक नाही, अचानक शेअर बाजार कोसळला, पाहा काय घडले

मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स तसेच राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीने अर्थसंकल्पाचे थंडे स्वागत केले आहे. शेअरबाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली आहे. मुंबई शेअरबाजाराचा सेनेक्स बाजाराला सुरुवात होताच ३०० हून अधिक अंशांनी कोसळला आहे.

Stock Market And Budget : बजेटचे शेअरबाजाराला कौतूक नाही, अचानक शेअर बाजार कोसळला, पाहा काय घडले
Follow us
| Updated on: Feb 01, 2025 | 2:07 PM

अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज संसदेत आज अर्थसंकल्प – २०२५ सादर केला आहे.या अर्थसंकल्पात मध्यम वर्गाला मोठा दिलासा देण्यात आला आहे. १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त झाले आहे. एकीकडे मध्यमवर्गाला आनंदाच्या उकळ्या फुटत असताना शेअर बाजाराने मात्र बजेटचे स्वागत केलेले नाही.मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक बजेट सुरु होतात ३०० हून अधिक अकांनी घसरला आहे. शेअर बाजारात एकीकडे पडझड होत असताना दुसरीकडे काही शेअर मात्र त्यांचा चांगला कारभार करताना दिसत आहेत. अदानी कंपनीचे शेअर चांगला व्यवसाय करीत आहेत. तसेच सरकारी कंपन्याचे शेअर देखील चांगले तेजीत आहेत.

अर्थसंकल्प सादर करताना अर्थ मंत्री निर्मला सितारमन यांनी न्यू टॅक्स पॉलीसीची घोषणा केली आहे. ते पुढील आठवड्यापासून लागू होणार आहे. एकीकडे मध्यम वर्गाने बजेट-२०२५ ची घोषणा केली असताना दुसरीकडे शेअर बाजाराने मात्र बजेटचे थंडे स्वागत केले आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थसंकप्ल सादर होताच अचानक कोसळला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १११.१५ अंकानी घसरून २३,३९७.२५ वर आला आहे. तर मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स आज ३०० हून अधिक अंकानी कोसळून ७७,१९३.२२ अंशांवर कारभार करत आहे.

पीएसयू शेअरमध्ये उसळी

शेअर बाजार दबावाखाली पाहायला मिळत आहे. लोकांनी विक्रीचा सपाटा लावला असला तरी सरकारी कंपन्यांतील शेअर मात्र तेजीत आहे. आरव्हीएनएलमध्ये पाच टक्के तेजी, आयआरबीत ५ टक्के तेजी, माझगांव डॉक,बीडीएल आणि एनएचपीसी सारखे शेअर तेजीत आहेत. आणि चांगला कारभार करीत आहेत. अदानी कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी

शेअरबाजाराने जरी अर्थसंकल्पाचे स्वागत केले नसले तरी या मोठ्या उलट फेरात देखील अदानी कंपनीच्या शेअरमध्ये चांगली गुंतवणूक होत आहे. अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये अदानी पॉवरचा शेअर ४ टक्के, अदानी ग्रीनचा ३.५२ टक्के आणि अदानी एन्टरप्राईझेस २.४६ टक्के , अदानी पोर्ट, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मरचे शेअर देखील तेजीत असून चांगला कारभार करीत आहेत.

शेअर बाजारात काय झाले

मुंबई शेअर बाजाराच्या ( सेसेक्स ) टॉप ३० शेअरमध्ये ९ शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. तर इत २१ शेअर चांगला कारभार करीत आहेत. यात सर्वाधिक उसळी आयटीसी हॉटेल्सच्या शेअर्समध्ये पाहायला मिळाली आहे. आयटीसी हॉटेल्सचा शेअर तीन टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. तर टायटनच्या शेअरमध्ये किरकोळ घसरण झाली आहे. एनएसईच्या टॉप ५० शेअर्समध्ये आयटीसी होटल्स, महिंद्र एण्ड महिंद्र, बेल, अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअरमध्ये तीन टक्क्यांपर्यंत उसळी पाहायला मिळाली आहे. तर राष्ट्रीय शेअरबाजारातील एनएसईच्या टॉप ५० शेअरमध्ये २३ शेअरची घसरण झाली आहे.त्यात हिरो मोटोकॉर्प आणि विप्रो सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

या सेक्टरवर प्रचंड दडपण

मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजारात आयटी सेक्टर वगळता सर्व इंडेक्समध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. जी सुमारे एक टक्के आहे. FMCG ( Fast-Moving Consumer Goods ) त्यानंतर बँकींग आणि अन्य सेक्टर्सच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे.

या शेअरवर राहील फोकस

बजेटच्या सादर करताना एचएएल, बीडीएल, बीईएल, एमटीएआर, डेटा पॅटर्न, पारस डिफेन्स, जीआरएसई, कोचीन आणि माझगाव डॉक या कंपन्यांच्या शेअरवर फोकस राहणार आहे.

( सूचना – कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत आवश्यक घ्यावी.)

पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.