AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनानंतर पहिल्यांदा शेअर बाजारात हाहाकार, ट्रम्प यांच्या धोरणामुळे बाजारात ‘ब्लॅक मंडे’

Stock Market Crash: भारताप्रमाणे आशियाई शेअर बाजारसुद्धा मोठ्या घसरणीसह उघडले. जपान, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया यासारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण आहे.

कोरोनानंतर पहिल्यांदा शेअर बाजारात हाहाकार, ट्रम्प यांच्या धोरणामुळे बाजारात 'ब्लॅक मंडे'
share market crash
| Updated on: Apr 07, 2025 | 9:56 AM
Share

India share market crash: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजार उघडला तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्समध्ये 3000 हून अधिक अंकांची घसरण झाली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 1000 हून अधिक अंकांच्या घसरणीसह व्यवहार करू लागला. टाटा मोटर्सपासून ते माझगाव डॉकपर्यंतचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात झपाट्याने घसरले. भारताप्रमाणे आशियाई शेअर बाजारसुद्धा मोठ्या घसरणीसह उघडले. जपान, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया यासारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण आहे.

बाजार उघडताच घसरण

शेअर बाजारातील व्यवहाराच्या प्रारंभी बीएसई सेन्सेक्स 75,364.69 च्या मागील बंदच्या तुलनेत 71,449 च्या स्तरावर घसरला आणि उघडला, तर एनएसई निफ्टीने मागील 22,904 च्या बंदच्या तुलनेत 21758 वर व्यापार सुरू केला. यानंतर दोन्ही निर्देशांक थोड्याच वेळात आणखी घसरायला लागले. निफ्टी-50 1000 अंकांनी घसरून 21,743 वर आला. तर सेन्सेक्स 71,425 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला.

तज्ज्ञांनी काय दिला सल्ला

टीव्ही ९ मराठीसोबत बोलताना अर्थ तज्ज्ञ म्हणाले, राजेश हट्टंगडी म्हणाले, सामान्य गुंतवणूकदारांनी सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका ठेवावी. घाबरुन विक्री करु नये. शेअर बाजार ओव्हार रिअॅक्ट करत आहे. परिस्थिती इतकी खराब नाही. सर्वांचे लक्ष सध्या ट्रम्प यांच्या पुढील घोषणेकडे आहे. गुंतवणूकदरांनी टप्पा टप्प्याने गुंतवणूक करावी, असे त्यांनी म्हटले.

शुक्रवारी बीएसईचा सेन्सेक्स 930.67 अंकांनी म्हणजेच 1.22 टक्क्यांनी घसरला होता. 75,364.69 वर बंद झाला होता. तर एनएसईचा निफ्टी 345.65 अंकांनी किंवा 1.49 टक्क्यांनी घसरून 22,904.45 वर बंद झाला होता.

सोमवारी भारतीय शेअर बाजारासाठी आधीच जागतिक बाजारातून घसरणीचे संकेत मिळाले होते. आशियाई शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली. हाँगकाँगचा हँग सेंग 9 टक्क्यांहून अधिक घसरला होता, तर जपानचा निक्केई 8 टक्क्यांहून अधिक घसरला होता.

सोमवारी टाटा स्टील शेअरमध्ये मोठी घसरण झाली. हा शेअर 10.43 टक्क्यांनी घसरून 125.80 रुपयांवर आला. याशिवाय टाटा मोटर्स शेअर (8.29%), इन्फोसिस शेअर (7.01%), टेक महिंद्रा शेअर (6.85%), एलटी शेअर (6.19%), एचसीएल टेक शेअर (5.95%), अदानी पोर्ट्स शेअर (5.54%), टीसीएस शेअर (4.99%), रिलायन्स शेअर (4.55%) आणि 4.04 एनटीपीसी शेअर (4.55%) घसरले.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.