स्विगीमध्ये मोठा खेळ, ज्युनिअर कर्मचाऱ्याने लावला 33 कोटींचा चुना…आयपीओ येण्यापूर्वी झटका
swiggy: स्विगीने मागील वर्षी 11,247 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. कंपनीच्या तोटाही 44 टक्के कमी होऊन 2,350 कोटी रुपयांवर आला. स्विगीचे एकूण ऑर्डर मूल्यही 26 टक्क्यांनी वाढून 4.2 अब्ज रुपये झाले आहे. स्विगीने सांगितले की, इंस्टामार्टचा व्यवसायही वेगाने वाढत आहे.

झोमॅटोची स्पर्धक कंपनी असलेल्या स्विगीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ज्युनिअर कर्मचाऱ्याने 33 कोटींचा घोटाळा केला आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कंपनी आता त्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. स्विगीने त्या कर्मचाऱ्याचे नाव जाहीर केले आहे. कंपनीचा आयपीए येणार असताना ही बातमी आल्यामुळे कंपनीला मोठा झटका बसला आहे.
वार्षिक अहवालातून खुलासा
स्विगीने वार्षिक अहवालात म्हटले आहे की, कंपनीतील एका माजी कर्मचाऱ्याने 32.67 कोटी रुपयांची हेराफेरी केली. तो कर्मचारी कंपनी सोडून गेला आहे. त्याची माहिती मिळाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर प्रक्रिया केली जात आहे. कंपनीने 31 मार्च 2024 पर्यंत ऑडिट केले, त्यामधून ही माहिती समोर आली. त्यात 32.67 कोटींचा एक्स्ट्रा खर्च झाल्याचे समोर आले. या खर्चाचा कंपनीतील इतर खर्चांशी काहीच संबंध नाही. ही बातमी आल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. एक लहान कर्मचारी कंपनीत इतका मोठा घोटाळा कसा करु शकतो? असा प्रश्न विचारला आहे.
कंपनीचा आयपीओ येणार
स्विगीने आयपीओसाठी ड्राफ्ट पेपर जमा केला आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी मोठी रक्कम जमवण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी 3,750 कोटी फ्रेश इश्यूमधून तर 6,664 कोटी रुपये ऑफर फॉर सेलमधून जमा करण्याच्या तयारीत आहे. एकूण 10,414 कोटी रुपये आयपीओमधून कंपनीला मिळणार आहे.
स्विगीने मागील वर्षी 11,247 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. कंपनीच्या तोटाही 44 टक्के कमी होऊन 2,350 कोटी रुपयांवर आला. स्विगीचे एकूण ऑर्डर मूल्यही 26 टक्क्यांनी वाढून 4.2 अब्ज रुपये झाले आहे. स्विगीने सांगितले की, इंस्टामार्टचा व्यवसायही वेगाने वाढत आहे.
