AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air India Plane Crashed : एअर इंडियाचं विमान कोसळताच शेअर बाजारात भूकंप, टाटा ग्रुपचे शेअर क्रॅश

Air India Plane Crashed : गुजरातमध्ये झालेल्या या विमान अपघाताने शेअर बाजारालाही हादरवून टाकले आहे. अपघाताची बातमी येताच टाटा ग्रुपचे सर्व शेअर्स एकामागून एक कोसळले.

Air India Plane Crashed : एअर इंडियाचं विमान कोसळताच शेअर बाजारात भूकंप, टाटा ग्रुपचे शेअर क्रॅश
एअर इंडियाचं विमान कोसळताच शेअर बाजारात कोलाहलImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jun 12, 2025 | 4:03 PM
Share

Air India Plane Crashed : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं एक पॅसेंजर विमान कोसळऊन प्रचंड मोठा अपघात झाला आहे. अहमदाबादच्या मेघानी परिसरात थोड्याच वेळापूर्वी अपघाता झाला. लंडनला जाणाऱ्या या विमानाने टेकऑफ करताच 10 मिनिटांत ते रहिवासी भागात धा़कन खाली कोसळलं आणि सर्वत्र धुराचे लोट उसळले. अपघातावेळी विमानात 242 प्रवासी होते अशी देखील माहिती मिळत आहे. एनडीआरएफच्या टीम तसेच अनेक अँब्युलन्स, एअर अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या असून जखमी आणि होरपळलेल्या प्रवाशांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात आणण्यात येत आहे.

दरम्यान या विमान अपघाताने शेअर बाजारालाही हादरवून टाकले आहे. अपघाताची बातमी समोर येताच टाटा ग्रुपचे सर्व शेअर्स एकामागून एक धाडकन कोसळले. एअर इंडिया एअरलाइन कंपनी टाटा ग्रुपच्या मालकीची आहे. प्लेन क्रॅश होताच टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. एअरलाइनशी संबंधित या मोठ्या अपघातामुळे केवळ विमान वाहतूक क्षेत्रालाच नाही तर संपूर्ण टाटा समूहाच्या बाजारपेठेतील प्रतिमेला धक्का बसला आहे.

टाटा ग्रुपच्या या शेअर्समध्ये मोठी घसरण

TCS 1 टक्क्यांहून जास्त

टाटा स्टील 3 टक्के

टाटा पॉवर – 2.5 टक्के

एलेक्स- 2 टक्क्यांहून अधिक

टाटा कॉम – 1 टक्क्याहून जास्त

टाटा मोटर्स- 3 टक्क्यांहून जास्त

टाटा केमिकल – 3 टक्के

टाटा कंज्यूमर – 2 टक्क्यांहून जास्त

टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन- 4 टक्के

इंडियन हॉटेल – 2 टक्क्यांहून जास्त

टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स, टाटा कंझ्युमर, टाटा इन्व्हेस्टमेंट आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून येत आहे.

सेन्सेक्स निफ्टीची सध्याची स्थिती

भारतीय शेअर बाजारात गुरुवार, 12 जून रोजी मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनीही सुरुवातीच्या वाढीचा वेग गमावला आणि ते रेड झोनमध्ये झाले. सेन्सेक्स जवळजवळ 1 हजार अंकांनी घसरला, तर निफ्टी 24,850 च्या खाली घसरला. दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी सेन्सेक्स 983.21 कोसळून 81,531.93 वर पोहोचला. तर दुसरीकडे, निफ्टी 301.15 अंकांनी घसरून 24,840.25 वर बंद झाला. निफ्टीमध्ये सर्वात जास्त तोटा इन्फोसिस, इटरनल, टेक महिंद्रा आणि टाटा मोटर्स यांच्यात झाला.

242 प्रवासी होते

अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याचे वृत्त आहे. विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. एएनआयच्या माहितीनुसार, विमानात क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते. या दुर्घटनेत किती जीवित आणि वित्तहानी झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र बऱ्याच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.