नवी दिल्ली : टाटा समूहाची FMCG युनिट टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सने शुक्रवारी बिसलेरी अधिग्रहणाच्या चर्चाला पूर्णविराम दिला. त्यामुळे बिसलेरी (Bisleri) खरेदी करण्याची चर्चा बंद झाली. टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स बाटलीबंद पाणी विक्री करणारी कंपनी बिसलेरी खरेदी करण्यासाठी उत्सुक होती. यासंबंधीच्या चर्चेच्या फेऱ्या झाल्या. अंतिम टप्प्यात चर्चा फिस्कटली. त्यानंतर आता कोणता समूह बिसलेरी खरेदीसाठी समोर येतो, या चर्चा रंगल्या. पण नवीन माहितीनुसार, बिसलेरीचे मालक रमेश चौहान (Ramesh Chauhan) यांनी अजून याविषयीची अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांची एकलुती एक मुलगी जयंती चौहान (Jayanti Chauhan) आता हा कारभार सांभाळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.