आता टर्म इन्शुरन्स विकत घेणं सोपं राहणार नाही, कंपन्या प्रीमियम वाढवण्याच्या तयारीत!

Life Insurance: कुठल्या दुर्घटनेत घरातल्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा तो कमावण्यासाठी असक्षम झाला तर जीवन विमा पॉलिसी त्याच्या कुटुंबाला आधार देण्याचं काम करते.

आता टर्म इन्शुरन्स विकत घेणं सोपं राहणार नाही, कंपन्या प्रीमियम वाढवण्याच्या तयारीत!

तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप अमूल्य आहात. घरातील कमावता व्यक्ती, कुटुंबाचा सर्वात मोठा आर्थिक आधार असतो. त्यामुळेच कमावत्या व्यक्तीचं आयुष्य अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळेच जर कुठल्या दुर्घटनेत घरातल्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा तो कमावण्यासाठी असक्षम झाला तर जीवन विमा पॉलिसी त्याच्या कुटुंबाला आधार देण्याचं काम करते. ( Term insurance likely to be expensive. The insurance company is preparing to increase the premium)

टर्म इन्शुरंस कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचं निधन झाल्यानंतर कुटुंबाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मदत करत असतो. कुटुंबप्रमुख हा कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो. त्याचा मृत्यू किंवा तो गंभीर आजाराने ग्रासल्यास कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. जर अशा परिस्थितीत टर्म इन्शुरंस घेतला असेल तर कुटुंबाच्या उत्पन्नाचा स्रोत सुरु राहतो. नियमित उत्पन्नही मिळत राहतं.

वाढू शकतो प्रीमियम

टर्म इन्शुरन्स हा गंभीर आजार, अकस्मात मृत्यू किंवा सततच्या आजारांमध्ये कामी येतो. कित्येक कंपन्यांमध्ये कुटुंबातील सदस्यांना नियमित उत्पन्नाचा पर्याय दिला जातो. मात्र, गेल्या २ वर्षात कोरोना संकटात टर्म इन्शुरन्स प्लान विकत घेणं सोपं राहिलेलं नाही. प्योर प्रोटेक्शन देणारे अंडररायटिंग प्लानसाठी कंपन्या कडक पावलं उचलू शकतात, त्यामुळेच येणाऱ्या काळात टर्म इन्शुरंन्सच्या प्रीमियममध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

कडक होणार नियम

इन्शुरन्स कंपन्यांकडून टर्म इन्शुरन्सची अंडरायटिंग कडक केली जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांकडे कंपन्या उत्पन्नाच्या पुराव्यासह बँक स्टेटमेंटही मागू शकतात. याशिवाय, आरोग्य तपासणीचा नियमही लागू होऊ शकतो. खऱं म्हणजे, गेल्या काही काळात क्लेमची संख्या वाढली आहे, त्यामुळेच कंपन्या आता नियम कडक करताना दिसत आहेत.

टर्म इन्शुरन्स घेणं महागणार

टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम वाढल्यानंतर टर्म इन्शुरन्स प्लान विकत घेणं महाग होणार आहे. मात्र, ज्या ग्राहकांनी आधीच टर्म इन्शुरन्स घेऊन ठेवले आहेत, त्यांच्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही. मात्र, नवीन ग्राहकांना टर्म इन्शुरन्सचे जास्त पैसे मोजावे लागतील.

हेही वाचा:

Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीमध्ये पुन्हा एकदा मोठी घट, जाणून घ्या काय आहे कारण
मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अलायन्स एअरने उड्डाण करणार, 2520 रुपये असेल भाडे

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI