Elon Musk मुळे भारतात नवीन जॉब्स आले, या पदांसाठी निघाली भरती
मागच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांना भेटले. त्यानंतर आता भारतात नव्या नोकऱ्यांसाठी भरती सुरु झाली आहे. या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

बऱ्याच काळापासून सुरु असलेल्या चर्चेनंतर इलॉन मस्कची कंपनी टेस्ला भारतात एन्ट्री घेण्यासाठी सज्ज आहे. आता मार्ग मोकळा झाला आहे. भारतात टेस्लाने नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. कंपनीने आपल्या लिंक्डइन अकाऊंटवर 13 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मागच्या आठवड्यात अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इलॉन मस्क यांची भेट झाली होती. त्यानंतर टेस्ला कंपनीने आता भारतात भरती प्रक्रिया सुरु केली आहे. बिझनेस टुडेच्या रिपोर्ट्नुसार आता Tesla कडून नव्या नोकऱ्यांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. भारतात टेस्लाची फॅक्टरी कुठे सुरु होणार? या बद्दल अजून काही माहिती नाहीय. पण कंपनीने नोकरीसाठी जाहीरात दिली आहे. भारतात टेस्लाची एन्ट्री लवकर होणार याचे हे संकेत आहेत. इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने विविध विभागांसाठी नोकरीचे अर्ज मागवले आहेत. लिंक्डइन पोस्टनुसार कस्टमर सपोर्टपासून ते बँकएंड रोल या पदांसाठी अर्ज मागवलेत.
कुठल्या पदांसाठी मागवले अर्ज
ऑर्डर ऑपरेशन एक्सपर्ट
सर्विस टेक्निशियन
कस्टमर सपोर्ट स्पेशिएलिस्ट
बिजनेस ऑपरेशंस एनालिस्ट
सर्विस मॅनेजर
स्टोर मॅनेजर
कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर
कस्टमर सपोर्ट सुपरवायजर
ऑर्डर ऑपरेशन्स स्पेशिलिस्ट
इनसाइड सेल्स एडवायजर
पार्ट्स एडवायजर
टेस्ला एडवायजर
डिलीवरी ऑपरेशंस स्पेशिएलिस्ट
टेस्लाच्या भारतातील एन्ट्रीला मुख्य अडथळा काय होता?
परदेशात निर्मिती होणाऱ्या कार्सच्या आयातीवर भारतात मोठ्या प्रमाणात आयात शुल्क आकारल जातं. हा टेस्लाच्या भारतातील प्रवेशमागे मुख्य अडथळा होता. आता भारत सरकारकडून या संबंधी एक मोठ पाऊल उचलण्यात आलय. 40,000 हजार डॉलरपेक्षा अधिक किंमतीच्या हाय-एन्ड कार्सवर सीमा शुल्क 110 टक्क्यावरुन घटवून 70 टक्के करण्यात आलय. हे पाऊल टाकल्यामुळे टेस्लाचा भारतातील प्रवेशाचा मार्ग सुकर होणार आहे.