Gold, Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात ‘या’ महिन्यातील सर्वात मोठी घसरण; 800 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त, पटापट तपासा

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (वस्तू) तपन पटेल यांनी सांगितले की, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या स्पॉट किमतीत 810 रुपयांची घसरण झालीय, पण तरीही त्यावर कॉमेक्स सोन्याच्या किमतीत एका रात्रीत झालेल्या घसरणीचा परिणाम दिसून येतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे भाव 1,806 डॉलर प्रति औंस आणि 24.05 डॉलर प्रति औंस होते.

Gold, Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात 'या' महिन्यातील सर्वात मोठी घसरण; 800 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त, पटापट तपासा
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 5:35 PM

नवी दिल्लीः Gold, Silver Price Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता सोने खरेदी करणे पुन्हा एकदा स्वस्त झालेय. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा दर 810 रुपयांनी घसरून 46,896 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. HDFC सिक्युरिटीजच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत एका रात्रीत झालेल्या घसरणीचा परिणाम दिसून आला. मागील व्यवहारात सोने 47,706 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. चांदीचा भावही 1,548 रुपयांनी घसरून 62,720 रुपये प्रति किलो झाला. आधीच्या व्यवहारात तो 64,268 रुपये प्रति किलो होता.

सोन्यात का झाली घसरण?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या स्पॉट किमतीत 810 रुपयांची घसरण झालीय, पण तरीही त्यावर कॉमेक्स सोन्याच्या किमतीत एका रात्रीत झालेल्या घसरणीचा परिणाम दिसून येतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे भाव 1,806 डॉलर प्रति औंस आणि 24.05 डॉलर प्रति औंस होते. त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सोन्याचा भाव सध्या 47,884 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत चांदीचा भाव सध्या 64,532 रुपये प्रतिकिलो आहे. कोलकात्यात चांदीचा भाव सध्या 64,700 रुपये प्रति किलो आहे. पश्चिम बंगालच्या राजधानीत 48,700 रुपयांना सोने खरेदी केले जाऊ शकते.

फ्युचर्स ट्रेडमधील किमती

वायदा व्यवहारात सोन्याचा भाव 106 रुपयांनी घसरून 47,817 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 106 रुपये किंवा 0.22 टक्क्यांनी घसरून 47,817 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. ही किंमत 4844 लॉटच्या व्यवसाय उलाढालीसाठी आहे. मंगळवारी वायदे व्यवहारात चांदीचा भाव 632 रुपयांनी घसरून 63,932 रुपये प्रतिकिलो झाला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 632 रुपये किंवा 0.98 टक्क्यांनी घसरून 63,932 रुपये प्रति किलो झाला. या किमती 7,199 लॉटच्या व्यवसाय उलाढालीसाठी आहेत. मंगळवारच्या सुरुवातीच्या नुकसानात बहुतांश सावरल्यानंतर रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 74.43 वर बंद झाला. याचे कारण देशांतर्गत शेअर बाजारातील सकारात्मक कल आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण हे आहे.

संबंधित बातम्या

कोण होणार रिलायन्सचा उत्तराधिकारी? मुकेश अंबानी बनवतायत महत्त्वाचा प्लॅन : रिपोर्ट

Petrol Diesel Price: ऑईल कंपन्यांकडून नवे दर जाहीर; ‘असे’ चेक करा घरीबसल्या अपडेट भाव

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.