Online Game : ऑनलाईन गेमवर केंद्र सरकारचा ‘खेळ’, नुकसान असो वा फायदा, तुमचा खिसा तर कापल्या जाणारच!

Online Game : ऑनलाईन गेमवर केंद्र सरकारची पुन्हा वक्र दृष्टी फिरली आहे, तुमचा खिसा आता आणखी कापल्या जाण्याची शक्यता आहे.

Online Game : ऑनलाईन गेमवर केंद्र सरकारचा 'खेळ', नुकसान असो वा फायदा, तुमचा खिसा तर कापल्या जाणारच!
युझर्सचा गेमImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 4:42 PM

नवी दिल्ली : जर तुम्हाला ही ऑनलाईन गेमिंगची (Online Gaming) सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच. विरुंगुळा, छंद अथवा सवय यामुळे मोठा वर्ग ऑनलाईन गेमिंकडे वळला आहे.तुमच्या या छंदातून केंद्र सरकार (Central Government) कमाईचे माध्यम शोधत आहे. यापूर्वी ऑनलाईन गेमिंगवर कर (Tax) लावण्यात आला आहे, आता त्यात वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

वस्तू आणि सेवा कर लावण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. सध्या ऑनलाईन गेमिंगवर 18 टक्के जीएसटी लावण्यात येतो. यातून केंद्र सरकारच्या तिजोरीत मोठी गंगाजळी जमा होत आहे.

परंतु, राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या समितीने (GoM) ऑनलाईन गेमिंगवर (GST Tax on Online Gaming) करात वाढ करुन तो 28 टक्के करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांचा खिसा कापल्या जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

एवढेच नाही तर ऑनलाईन गेमिंगमधील लुडो, कॅरम, रमी, क्रिकेट आणि इतर खेळांवर समान वस्तू आणि सेवा कर लावण्याची कवायत पार पाडली जाणार आहे. त्यामुळे मोबाईलवर टाईमपास करणाऱ्यांना झटका बसण्याची शक्यता आहे.

या समितीने, GoM ने गेम ऑफ स्किल आणि गेम ऑफ चान्स असा भेदभाव करण्यास विरोध केला आहे. समितीने सरसकट सर्वच खेळ 28 टक्के जीएसटीच्या कक्षेत आणण्याची शिफारस केली आहे.

सध्या ऑनलाईन गेमिंगसाठीच्या पोर्टलवर ग्रॉस गेमिंग रेव्हन्यूवर युझर्संना कर मोजावा लागतो. हा पोर्टलचा व्यावसायिक महसूल असतो, तो वापरकर्त्यांकडून वसूल करण्यात येतो. आता या करात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

GoM ने या विषयीचा अहवाल तयार केला आहे. या अहवालावर जीएसटी परिषद (GST Council) त्यांच्या बैठकीत निर्णय घेणार आहे. त्यानंतर वापरकर्त्यांना सर्वच खेळ 28 टक्के जीएसटी मोजावा लागेल.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.