AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rates Today | सोने चांदीला महागाईचा रंग, जाणून घ्या काय आहेत आजचे भाव

Gold rate today: ibjarates.com या संकेतस्थळानुसार, आज बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ झाली. गेल्या दरापेक्षा आज सोने आणि चांदीचे भाव वाढले.

Gold Silver Rates Today | सोने चांदीला महागाईचा रंग, जाणून घ्या काय आहेत आजचे भाव
आजचे सोने चांदीचे दरImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 22, 2022 | 2:54 PM
Share

Gold Silver Rate Today | आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्या चांदीत घसरणीचे सत्र सुरु आहे. ibjarates.com या संकेतस्थळानुसार सोन्या चांदीच्या किंमतीत (Gold Silver rate today) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी, 22 july 2022 रोजी वाढ झाली आहे. असं असलं तरी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रचंड घसरले आहे आणि देशांतर्गत किंमतीत ही घसरण पहायला मिळेल. 22 जुलैच्या सकाळी 999 शुद्ध(Pure) सोने प्रति 10 ग्रॅम 50,677 रुपयांना विक्री होत होते. तर 999 शुद्ध चांदीचा दर प्रति किलो 55,085 रुपये होता. ibjarates नुसार, 995 शुद्ध सोने प्रति 10 ग्रॅम 50,474 रुपयांना विक्री होत होते. तर 916 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,420 रुपये होता. याशिवाय 750 शुद्ध सोन्याचा भाव 38008रुपये होता. 585 शुद्ध 10 ग्रॅम सोने 29646 रुपयांना विक्री होत होते. तर 999 शुद्ध चांदीचा दर प्रति किलो 55085 रुपये होता. डॉलर (Dollar) मजबूत स्थिती असल्यामुळे सोन्या चांदीचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या काळात सोन्यात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वायदे बाजारात आणि सराफा बाजारात या दोन्हींमध्ये केलेली गुंतवणूक ही भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

राज्यातील चार शहरांतील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार(Good Return Website) मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,180 प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,000 रुपये आहे. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,220 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,040 आहे. नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 50,220 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,040 आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,040 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,220 रुपये आहे. तर चांदीचा भाव प्रति 10 ग्रॅम 556 रुपये होता.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.