Essential Goods Price | महिनाभरात पीठ, तेल, तांदूळ, डाळींचे भाव कमी, मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत जनता होरपळलेलीच

Essential Goods Price | गेल्या महिनाभरात पीठ, तांदूळ, तेल आणि डाळींचे दर कमी झाले आहेत. मात्र, वर्षभरापूर्वीच्या तुलनेत आजही भाव जास्त असल्याने जनता होरपळलेलीच आहे. गेल्या महिनाभरात मोहरीच्या तेलाच्या दरात 2.89 टक्क्यांनी घट झाली आहे.

Essential Goods Price | महिनाभरात पीठ, तेल, तांदूळ, डाळींचे भाव कमी, मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत जनता होरपळलेलीच
महिनाभरात दर कमी पण जनता होरपळलेलीचImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 2:40 PM

Essential Goods Price | कोरोना महामारीनंतर आणि अनेक वस्तुंच्या (Goods) किंमती प्रचंड वाढल्याने देशभरात महागाईचा (Inflation) आगडोंब उसळला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी (Petrol-Diesel Price) कधी शंभरी गाठली ते जनतेलाही कळालं नाही. घरगुती गॅसच्या (LPG Cylinder) किंमतींनी तर हजारांचा टप्पा कधीचाच ओलांडला असून या किंमतींची आगेकूच सुरुच आहे. एवढंच कमी होतं की काय म्हणून सरकारने सीलबंद आणि पॅकड खाद्यान्न आणि अन्नधान्यावर जीएसटी (GST) आकारल्याने महागाईत (Inflation) तेल ओतल्या गेले आहे. खाद्यतेलाच्या(edible oil) वाढलेल्या किंमती तेवढ्या कमी झाल्या हे जनतेचे नशीब म्हणावे लागेल. तर बातमी अशी आहे की, गेल्या महिनाभरात मैदा, तांदूळ, तेल आणि डाळीचे दर घसरले आहेत. मात्र, वर्षभरापूर्वीच्या तुलनेत आजही भाव जास्त आहेत. गेल्या एका महिन्यात मोहरीच्या तेलाच्या किमती 2.89 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. पण वर्षभरापूर्वीच्या तुलनेत त्या 2.87 टक्क्यांनी महागच आहेत . हरभरा वा चणा डाळ 1.75 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे, तर तूर डाळीच्या दरात महिनाभरात 1.28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही ताजी आकडेवारी ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या (Ministry of Consumer Affairs) वेबसाइटवर देण्यात आली आहे.

डाळीच्या किंमती

सर्वात अगोदर, डाळींच्या किंमती पाहुयात. गेल्या वर्षी 28 जुलै रोजी दिल्लीत चणा डाळीची म्हणजेच हरबरा डाळीची किरकोळ किंमत 77 रुपये होती, जी आता 70 रुपये प्रति किलोवर आली आहे. त्याच वेळी, रांचीमध्ये 72 रुपये भाव होते ते आता 64 रुपये आहे, मुंबईमध्ये गेल्यावेळी 75 रुपये भाव होते ते दर आता 68 रुपये आहे. कोलकातामध्ये गेल्यावर्षी भाव 74 रुपये होते ते यावेळी 75 रुपये आहे. तूर डाळीच्या भाव कमी झाले आहेत. दिल्लीत वर्षभरापूर्वी एक किलो तूर डाळीसाठी 112 रुपये मोजावे लागत होते. आता दर 4 रुपयांनी स्वस्त होऊन 108 रुपये झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

खाद्यतेलाचे भाव घसरले

खाद्यतेलाच्या किंमती गेल्या वर्षभरात प्रचंड वेगाने वाढल्या तर त्या कमीही झाल्या आहेत. दिल्लीत वर्षभरापूर्वी एक किलो मोहरीच्या तेलाची किंमत 170 रुपये होती, ती वाढून 179 रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये ते 192 रुपये झाले आहे. सूर्यफूल तेल 191 रुपयांवरून 107 रुपयांवर, तर पामतेल 129 रुपयांवरून 141 रुपयांवर पोहोचले आहे. धान्य आणि साखरेच्या किंमती ही महागल्या आहेत. गेल्या वर्षभरात तांदूळ 1.67 टक्के, गहू 11.07 टक्के, साखर 6.10 टक्के आणि पीठ 11.73 टक्के महागले आहे. अशातच तेल उत्पादन कंपन्यांनी भावात आणखी सवलत देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्याचा परिणाम पुढील महिन्यात दिसून येईल.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.