AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील आठवड्यात लॉन्च होणार हे 5 IPO, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

पुढील आठवड्यात बाजारात पाच IPO लॉन्च होणार आहेत. त्यामुळे ज्यांचा गुंतवणूक करण्याचा विचार आहे. त्यांना या संधीचा उपयोग करुन घेता येऊ शकतो. कोणते आहेत ते पाच IPO जाणून घ्या.

पुढील आठवड्यात लॉन्च होणार हे 5 IPO, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी
IPO
| Updated on: Nov 17, 2023 | 4:45 PM
Share

New IPO : पुढील आठवड्यात म्हणचजेच 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान बाजारात पाच IPO येणार आहेत. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.  दिवाळी संपल्यानंतर आता गुंतवणूकदारांचा कल शेअर बाजाराकडे असणार आहे. गंधार ऑइल रिफायनरी इंडियाचा IPO, FedBank Financial Services चा IPO, इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचा IPO, फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीजचा IPO आणि बहुप्रतिक्षित Tata Technologies IPO पुढील आठवड्यात शेअर मार्केटमध्ये येणार आहे.

  • IREDA IPO चा प्राइस बँड ₹ 10 च्या दर्शनी मूल्यासह प्रति इक्विटी शेअर 30 ते 32 रुपये निश्चित करण्यात आला आहे. हा IPO 21 नोव्हेंबरला ओपन होईल. तर 23 नोव्हेंबरला बंद होईल. या IPO साठी गुंतवणूकदारांना वाटप सोमवार 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
  • फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आयपीओची किंमत 5 रुपये दर्शनी मूल्यावर 288 ते 304 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. हा IPO 22 नोव्हेंबरला उघडेल आणि 24 नोव्हेंबरला बंद होईल. या IPO साठी गुंतवणूकदारांना वाटप 21 नोव्हेंबर रोजीच केले जाईल.
  • गंधार ऑइल रिफायनरी इंडियाचा IPO 22 नोव्हेंबर रोजी बाजारात येईल आणि 24 नोव्हेंबर रोजी बंद होईल. अहवालानुसार, गंधार ऑइल रिफायनरी IPO साठी गुंतवणूकदारांना वाटप मंगळवार, 21 नोव्हेंबर रोजी होणार आहे. बँड 2 च्या दर्शनी मूल्यासह गंधार ऑइल IPO ची किंमत 160 ते 169 रुपये प्रति इक्विटी शेअर दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.
  • Fedbank Financial Services Limited चा IPO देखील 22 नोव्हेंबरला उघडेल आणि 24 नोव्हेंबरला बंद होईल. अहवालानुसार, Fedbank IPO साठी अँकर गुंतवणूकदारांना 21 नोव्हेंबर रोजी वाटप केले जाईल. फेडबँक फायनान्शिअल सर्व्हिसेस IPO चा प्राइस बँड रु. 133 ते रु. 140 प्रति इक्विटी शेअर 10 रूपये दर्शनी मूल्यासह निश्चित करण्यात आला आहे.
  • गुंतवणूकदार यंदा टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची सर्वाधिक वाट पाहत आहेत. 22 नोव्हेंबरला उघडणारा हा IPO 24 नोव्हेंबरला बंद होईल. या IPO ची किंमत 2 रुपये दर्शनी मूल्यावर 475 ते 500 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. हा शेअर ग्रे मार्केटमध्ये सुमारे 350 रुपयांच्या प्रीमियमसह व्यवहार करत आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.