AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेमेंट आणि चेकबुक संबंधित नियमांपासून ते पगारापर्यंत 5 दिवसांनंतर हे 6 नियम बदलणार

1 ऑक्टोबरपासून डिजिटल लाईफ सर्टिफिकेटशी संबंधित नियम बदलत आहेत. आता देशातील सर्व वृद्ध निवृत्तीवेतनधारक जे 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, ते देशातील सर्व प्रमुख पोस्ट ऑफिसच्या जीवनप्रदान केंद्रात डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील, यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आलीय.

पेमेंट आणि चेकबुक संबंधित नियमांपासून ते पगारापर्यंत 5 दिवसांनंतर हे 6 नियम बदलणार
| Edited By: | Updated on: Sep 26, 2021 | 7:20 AM
Share

नवी दिल्ली : पाच दिवसांनी म्हणजे 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला अनेक नवीन बदल (1 ऑक्टोबर 2021 पासून बदल) पाहायला मिळतील. होय.. सप्टेंबर महिना पूर्ण होण्यासाठी फक्त 5 दिवस शिल्लक आहेत आणि त्यानंतर ऑक्टोबर महिना सुरू होईल. ऑक्टोबरच्या सुरुवातीला तुमच्या बँक आणि पगाराशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. पुढील महिन्यापासून अनेक दैनंदिन गोष्टी बदलणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून महत्त्वाचे नियम बदलतील. हे बदल विशेष माणसाच्या जीवनाशी संबंधित आहेत. यामध्ये बँकिंग नियमांपासून एलपीजीपर्यंत अनेक बदलांचा समावेश आहे.

पेन्शन नियमांमध्ये बदल होणार

1 ऑक्टोबरपासून डिजिटल लाईफ सर्टिफिकेटशी संबंधित नियम बदलत आहेत. आता देशातील सर्व वृद्ध निवृत्तीवेतनधारक जे 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, ते देशातील सर्व प्रमुख पोस्ट ऑफिसच्या जीवनप्रदान केंद्रात डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील, यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आलीय. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे काम टपाल कार्यालयाच्या माध्यमातून सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय डाक विभागाने जीवनप्रदान केंद्राचा आयडी आधीच बंद असेल, तर वेळेवर कार्यान्वित होईल याची खात्री करण्यास सांगितले.

जुने चेकबुक 1 ऑक्टोबरपासून चालणार नाही

1 ऑक्टोबरपासून तीन बँकांची चेकबुक आणि एमआयसीआर कोड अवैध होतील. या बँका म्हणजे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC), युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि अलाहाबाद बँका आहेत. या बँका अशा आहेत, ज्या अलीकडे इतर बँकांमध्ये विलीन झाल्यात. बँकांच्या विलीनीकरणामुळे खातेधारकांच्या खाते क्रमांक, IFSC आणि MICR कोडमध्ये बदल झाल्यामुळे 1 ऑक्टोबर 2021 पासून बँकिंग प्रणाली जुना धनादेश नाकारेल. या बँकांची सर्व चेकबुक अवैध ठरतील.

ऑटो डेबिट कार्डचे नियम बदलतील

1 ऑक्टोबरपासून तुमच्या क्रेडिट/डेबिट कार्डवरून ऑटो डेबिटसाठी नवीन RBI (भारतीय रिझर्व्ह बँक) नियम लागू केला जात आहे. याअंतर्गत डेबिट आणि क्रेडिट कार्ड किंवा मोबाईल वॉलेटमधून काही ऑटो डेबिट ग्राहक मंजूर करेपर्यंत होणार नाही. 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होणाऱ्या नवीन अतिरिक्त फॅक्टर प्रमाणीकरण नियमानुसार, बँकेला कोणतेही ऑटो डेबिट पेमेंटद्वारे खाते डेबिट करण्याची परवानगी देण्यासाठी ग्राहकाला 24 तास अगोदर सूचना पाठवावी लागते. ग्राहकाच्या खात्यातून पैसे कन्फर्म झाल्यावरच डेबिट केले जातील. तुम्हाला ही सूचना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे मिळू शकते.

गुंतवणूक संबंधित नियमांमध्ये बदल होणार

बाजार नियामक सेबीने (सेबी) आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन नवीन नियम आणलाय. हा नियम अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AMC) अर्थात म्युच्युअल फंड हाऊसमध्ये काम करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. मॅनेजमेंट कंपन्यांच्या मालमत्तेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण वेतनाच्या 10 टक्के रक्कम त्या म्युच्युअल फंडाच्या युनिटमध्ये 1 ऑक्टोबर 2021 पासून गुंतवावी लागेल. तर 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत टप्प्याटप्प्याने ते पगाराच्या 20 टक्के असेल. गुंतवणुकीला लॉक-इन कालावधी देखील असेल.

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होणार

1 ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती एलपीजी आणि व्यावसायिक सिलिंडरच्या नवीन किमती निश्चित केल्या जातात.

खासगी दारूची दुकाने बंद

1 ऑक्टोबरपासून दिल्लीत खासगी दारूची दुकाने बंद होतील. 16 नोव्हेंबरपर्यंत मदिरा फक्त सरकारी दुकानांमध्ये विकली जाईल. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, नवीन अबकारी धोरणाअंतर्गत राजधानीचे 32 झोनमध्ये विभाजन करून परवाने वाटपाची प्रक्रिया करण्यात आली आहे. आता 17 नोव्हेंबरपासून दुकाने फक्त नवीन धोरणांतर्गत उघडतील.

संबंधित बातम्या

अॅमेझॉनकडून द ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2021 ची घोषणा, ‘या’ दिवसापासून विक्री सुरू

‘या’ 5 बँकांमध्ये बचत खात्यावर 7% पर्यंत व्याज, जाणून घ्या संपूर्ण तपशील

These 6 rules will change after 5 days from payment and checkbook related rules to salary

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.