किंमत म्हणाल तर एक रुपया पण नाही, पण परताव्यात हे शेअर वस्तादाला ठरले भारी

Multibagger Share | शेअर बाजारात अनेक शेअर्सची किंमत एक रुपया पण नाही. पण त्यांनी गेल्या महिन्यात गुंतवणूकदारांना लागलीच कमाई करुन दिली. त्यामुळे या सुपर पेनी स्टॉकची चर्चा सुरु आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. जो बाजारातील दिग्गज शेअर देऊ शकले नाहीत. कोणते आहेत हे स्टॉक?

किंमत म्हणाल तर एक रुपया पण नाही, पण परताव्यात हे शेअर वस्तादाला ठरले भारी
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 10:09 AM

नवी दिल्ली | 19 नोव्हेंबर 2023 : शेअर बाजारात प्रत्येक प्रकारचे स्टॉक आहेत. विविध क्षेत्रातील हजारो लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्या आहेत. काही कंपन्याच्या शेअरची किंमत तर एक रुपयांपेक्षा कमी आहे. बाजारात पेनी आणि सुपर पेनी स्टॉक पण असतात. त्यातील ज्यांचे फंडामेंटल मजबूत आहेत, असे स्टॉक भविष्यात कमाल दाखवू शकतात. पण बरेच गुंतवणूकदार, तज्ज्ञ पेनी स्टॉकला भंगार स्टॉक म्हणून ओळखतात. पण भंगारात पण आपल्या हाताला कधी कधी सोनं गवसतं की नाही राव, खरंय ना? तर तसंच शेअर बाजाराचे नियम लावून काही पेनी स्टॉक जोखायचे असतात. हे स्टॉक तुम्हाला मालामाल करु शकतात. या काही छोटूराममुळे गुंतवणूकदारांची कमाई झाली आहे.

एक रुपया पण नाही या स्टॉकची किंमत

हे सुद्धा वाचा
  1. सावाका बिजनेस शेअरची किंमत सध्या 88 पैसे आहे. 17 नोव्हेंबर रोजी या कंपनीच्या शेअरमध्ये 4.76 टक्के तेजी दिसून आली. गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना या शेअरने 7.32 टक्क्यांचा परतावा दिला आहे. ज्यांनी गुंतवणूक केली ते मालामाल झाले.
  2. श्री गणेश बायोटेक इंडिया लिमिटेड या शेअरची चर्चा आहे. तो 88 पैसे प्रति शेअर आहे. शुक्रवारी या शेअरमध्ये 4.76 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या एका महिन्यात या कंपनीने गुंतवणूकदारांना जवळपास 14.29 टक्क्यांचा नफा झाला.
  3. विसागर फायनेन्शिअल सर्व्हिसेजच्या शेअरची किंमत 77 पैसे आहे. या शेअरमध्ये शुक्रवारी जवळपास 1.28 टक्क्यांची घसरण दिसून आली. पंरतू, एका महिन्यात कंपनीच्या स्टॉकमध्ये 5.46 टक्क्यांची तेजी दिसून आली.
  4. ग्रीनक्रेस्ट फायनेन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडचा शेअर सध्या 70 पैशांना मिळतो. शुक्रवारी कंपनाच्या शेअरमध्ये 1.45 टक्क्यांची तेजी आली आहे. एका महिन्यात कंपनीने 12.90 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
  5. यामिनी इन्वेस्ट हा शेअर सध्या 79 पैशांना आहे. शुक्रवारी या शेअरमध्ये जवळपास 4 टक्क्यांची तेजी दिसून आली. एका महिन्यात गुंतवणूकदारांना या शेअरने 6.76 टक्क्यांची कमाई करुन दिली.
  6. गोल्ड लाईन इंटरनॅशनल फिनवेस्ट लिमिटेडचा शेअर सध्या 75 पैशांना आहे. या कंपनीचा शेअर 4.17 टक्क्यांनी वधारला आहे. एका महिन्यात कंपनीने शेअरधारकांना 11.94 टक्के रिटर्न दिला आहे.
  7. मोनोटाईप इंडिया कंपनीचा शेअर सध्या 52 पैशांना आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.96 टक्के तेजीसह बंद झाला. एका महिन्यात कंपनीने गुंतवणूकदारांना 6.12 टक्क्यांचा परतावा दिला.
  8. एव्हान्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअरची किंमत सध्या 54 पैसे आहे. या शेअरमध्ये शुक्रवारी 1.89 टक्क्यांची तेजी दिसून आली. एका महिन्यापूर्वी या शेअरने गुंतवणूकदारांना 35 टक्के रिटर्न दिला.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?.
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?.
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?.
१५ दिवसांची मुदत अन्यथा नागपुरात..., तुपकर यांचा निर्वाणीची इशारा का?
१५ दिवसांची मुदत अन्यथा नागपुरात..., तुपकर यांचा निर्वाणीची इशारा का?.
शिंदे यांना शिवीगाळ अन् दत्ता दळवी यांना अटक, राऊत यांनाही होणार अटक?
शिंदे यांना शिवीगाळ अन् दत्ता दळवी यांना अटक, राऊत यांनाही होणार अटक?.