महिन्याला इतकी होते एका Rapido ड्रायव्हरची कमाई, रक्कम जाणून बसेल धक्का ?
आजकाल नोकरी मिळत नसल्याने अनेक तरुण विविध मार्गाने पैसे कमवतात. कोणी ओला-उबेर चालवतात. कोणी फूड डिलीव्हरी करतात तर कोणी रॅपिडो बाईक टॅक्सी चालवून कुटुंबा चालवतात. एका रॅपिडो बाईकस्वाराची कमाईचा आकडा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रेपिडो बाईक टॅक्सीने ( Rapido Driver ) महानगरात चांगला जम बसवत आहे. एका रेपिडो बाईक टॅक्सी ड्रायव्हरची कमाई ऐकून तुम्हाला धक्का बसेल. LinkedIn वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टला कोमल पोरवाल नावाच्या महिलेने शेअर केले आहे. ही महिला पेशाने कॉपीरायटर आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलंय की रविवारी सुमारे 9 वाजता Rapidoने प्रवास केला होता. यावेळी तिने ड्रायव्हरशी बातचीत केली. त्यावेळी त्याने महिन्याभरात त्याची किती कमाई होते हे तिला सांगितले ते ऐकून धक्का बसला.
कमाई किती होते ?
कोमल हीने सांगितले की ड्रायव्हर खुषमस्कऱ्या आणि मनमिळावू होता. दोघांच्या गप्पा रंगल्या तेव्हा कोमलने त्याला विचारले, भैय्या तुम्ही पूर्ण वेळ हेच काम करता का ? यावर ड्रायव्हरने सांगितले की तो सकाळी Swiggy डिलिव्हरी पार्टनरचे काम करतो. सायंकाळी Rapido साठी ड्राईव्ह करतो आणि विकेंडला भावासोबत एका लोकल स्ट्रीट फूड स्टॉल ( पाणी पुरी ) चालवतो. म्हणजे कुटुंबाचे पालन नीट करता यावे. आयुष्य नीट चालावे यासाठी तो वेग-वेगळी काम करुन पैसे जमा करतो.
आनंदाने कुटुंबाचे पोषण करतो
ड्रायव्हरची कहानी ऐकून कोमल हैराण झाली. नंतर त्याने कोमलला सांगितले की, बस मॅडम, मेहनत थोडी जास्त आहे. परंतू घर आनंदाने चालू आहे. कोमलला या पद्धतीने या तरुण विविध मार्गाने महिन्याला एक लाख रुपयांची कमाई करत असल्याचे पाहून आश्चर्य वाटले. Rapido ड्रायव्हरची कहाणी ऐकून कोमलला तिच्या विचारांना बदलायला भाग पडले. कारण आजकाल कोणाला काम नको असे सर्रास म्हटले जाते. सोशल मीडियावर कोमल याने टाकलेल्या पोस्टमुळे लोक विविध स्वरुपाच्या कमेंट करत आहेत.
युजरच्या प्रतिक्रीया
एकाने लिहिलेय की जेव्हा आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल ठेवतो, तेव्हा अनेक लोक आहेत त्यांच्या गोष्टी ऐकायला मिळतात. एका आणखी एका युजरने लिहीले की जेव्हा एखादी व्यक्ती पॉझिटीव्ह आणि आनंदी रहातो. तर ती जास्त कमावते आणि जीवन आनंदाने जगते. जर कोणी व्यक्ती सातत्याने पैशांच्या मागे लागली तर तिला तणावाचा सामना करावा लागतो. मग अशी व्यक्ती वाईक सवयी आणि नशेच्या आहारी जाते. त्यामुळे त्याची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधरु शकत नाही.
