407 कोटींचे दान अन् पहिल्यांदाच या यादीत नीता-मुकेश अंबनींचे आले नाव, ही यादी तरी काय?
TIME 100 Philanthropy List 2025 : जगातील दिग्गज अब्जाधीश खोऱ्याने कमाई करतात. त्यांच्या कमाईचे आकडे डोळे विस्फरणारे असतात. पण या यादीत नीता-मुकेश अंबानी यांनी मोठी झेप घेतली आहे. कोणती आहे ही यादी, का होत आहे त्याची चर्चा?

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी पहिल्यांदाच टाईमच्या 100 दानवीरांच्या यादीत झेप घेतली आहे. या यादीत वॉरेन बफेपासून ते अझीम प्रेमजीपर्यंत अनेक दिग्गजांची नावे आहेत. टाईम 100 च्या दानशूर यादी 2025 नुसार, 92.5 अब्ज डॉलर संपत्तीसह मुकेश अंबानी हे केवळ एक व्यावसायिकच नाही तर एक दानशूर व्यक्ती सुद्धा आहेत. ते भारताच्या विविध क्षेत्रात योगदान देत आहेत. नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत.
407 कोटींचे दान
मुकेश आणि नीता अंबानी दोघांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा विस्तार केला आहे. 2024 मध्ये त्यांनी विविध सामाजिक कार्यासाठी 407 कोटी रुपये दान केल्याचे समोर आले आहे. या रक्कमेसह ते सर्वाधिक दान देणारे भारतीय उद्योगपती ठरले आहे. अंबानी कुटुंबाने धर्मार्थासाठी मोठी रक्कम खर्च केली. शिक्षण, आरोग्य सेवा, ग्रामीण विकास आणि महिला सशक्तीकरणासाठी त्यांनी अनेक कार्यक्रमासाठी मोठी रक्कम खर्च केली आहे.




या क्षेत्रात भरीव योगदान
विविध शिष्यवृत्तींसह त्यांनी शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी दानधर्म केला. शेती, जल सुरक्षा आणि रुग्णालय निर्मितीसाठी या दाम्पत्याने सढळ हाताने मदत केली. त्यांचा हा दानधर्म रिलायन्सचे विविध क्षेत्रातील साम्राज्य दाखवते. या जोडप्याकडे अंदाजे 110 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असल्याचा दावा करण्यात येतो. तर टाईम नुसार, मुकेश आणि नीता अंबानी यांनी दानधर्मातही हात आखडता घेतलेला नाही. त्यांनी सढळ हाताने गरजूंना मदत केली.
या यादीत अजून कोण?
या यादीत अझीम प्रेमजी, झिरोधाचे संस्थापक निखील कामत, डेव्हिड बेकहम, मायकल ब्लूमबर्ग, ओपरा विन्फ्रे, मेलिंडा फ्रेंच गेट्स, वॉरेन बफे यांचा पण समावेश आहे. या सर्वांनी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात त्यांच्या संपत्तीचा दानधर्मासाठी वापर केला आहे. त्यांच्यामुळे शिक्षण, मुलं, महिला यांच्या विकासासाठी मोठी रक्कम उपलब्ध झाली आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्यात या रक्कमेचा वापर झाला आहे. मानवतेसाठी त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.